Supreme Court News : ‘थातूरमातूर कारणं देऊ नका; हे प्रकरण कुठल्या दिवशी संपणार, हे स्पष्ट सांगा': कोर्टाने म्हटल्याचा शिवसेनेचा दावा

SC On Mla Disqualification Case : आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारले.
Rahul Narwekar and Supreme Court
Rahul Narwekar and Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

Thackeray Group And Pawar Group : शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेप्रकरणी पुढील सुनावणी येत्या ३० ऑक्टोबरला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज या प्रकरणी सुनावणी झाली. या सुनावणीनंतर ठाकरे गट आणि शरद पवार गटाने माध्यमांशी संवाद साधत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली.

Rahul Narwekar and Supreme Court
MLA Disqualification Case : तुमचं वेळापत्रक अमान्य, ३० ऑक्टोबरपर्यंत सुधारित वेळापत्रक सादर करा; सरन्यायाधीशांचा अध्यक्षांना आदेश

'निर्णय घ्यायला वेळ लागला नाही पाहिजे'

'आमदार अपात्रते प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा अध्यक्षांकडून तेच वेळापत्रक सादर करण्यात आले. हे वेळपत्रक सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले. तसेच वारंवार या प्रकरणात बघण्यासारखं काही नाही. हे फार काही मोठं प्रकरण नाही. यात जी दोन कलमं आहेत, त्यानुसारच निर्णय घ्यायचा आहे. हा निर्णय घेण्यासाठी जास्त वेळ लागण्याची गरज नाही. थातूरमातूर कारणं देऊ नका. कुठल्या दिवशी हे प्रकरण संपणार आहे, हे आम्हाला स्पष्ट सांगा', असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'तुषार मेहता यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात गल्लत करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही प्रकरणं एकत्र करण्याचा प्रयत्न केला. आणि काही प्रकरणं आताच दाखल झालेली आहेत. आम्हाला ठरवायचे आहे, असे न्यायालयात म्हणाले. पण याबाबतीत न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे सांगितले. आम्ही तुम्हाला ही शेवटची संधी देतोय. या शेवटच्या संधीत तुम्ही ३० तारखेला तुमचं सुधारित वेळापत्रक द्या. आणि किती दिवसांत हे प्रकरण संपवणार, हे त्यात स्पष्ट नसेल तर नाईलाजास्तव आम्हाला निर्णय घ्यावा लागेल', असे न्यायालयाने बजावल्याचे अनिल परब म्हणाले.

'ही त्यांना शेवटची संधी मिळालेली आहे. न्यायालयाला अपेक्षित असे वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांना द्यावे लागेल. त्यांनी तसे न दिल्यास न्यायालय आपला निर्णय घेईल', असे स्पष्ट संकेत आज न्यायालयाने दिल्याचे परब यांनी सांगितले. 'मला स्वतः त्यांच्यासोबत बसावं लागेल आणि हे सर्व वेळापत्रक ठरवावं', असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले. यानंतर न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना शेवटची संधी दिल्याचे परब म्हणाले.

३० ऑक्टोबरची डेडलाईन

'राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रतेची दोन्ही प्रकरणं एकत्रित करण्यात आली आहेत. आणि ३० ऑक्टोबरला दोघांनाही विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रक द्यावे लागेल', असे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या आधी या प्रकरणाचा निकाल लागेल का? यावर आव्हाड यांनी उत्तर दिलं. 'आमची आपेक्षा तशीच आहे. आणि ज्या पद्धतीने न्यायालयाने निर्वाणीचा इशारा दिला आहे. ३० तारखेपर्यंत सुधारित वेळपत्रक दिले नाही', तर आम्ही वेळापत्रक ठरवून देऊ असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाचे आदेश ऐकले नाही तर न्यायालय ३० तारखेला निर्णय देऊन वेळापत्रक जाहीर करेल', असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Rahul Narwekar and Supreme Court
Shiv Sena Party Crisis : मोठी बातमी ! ठाकरेंना धक्क्यांवर धक्के; सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com