Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

MLA Disqualification Result : निकालानंतर संजय राऊत कडाडले, बेकायदा विधानसभाध्यक्षांनी...

Roshan More

Mumbai : विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वपूर्ण निकाल देताना शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे कायम ठेवला. शिवाय शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची ठाकरे गटाची याचिकादेखील फेटाळली. ठाकरे गटाचे आमदारदेखील अपात्र ठरवण्यात आलेले नाहीत. मात्र, या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तोफ डागली आहे.

बेकायदा विधानसभाध्यक्षांनी हा बेकायदा निर्णय दिला आहे, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले. हा निकाल आम्ही मान्य करणार नाही. महाराष्ट्राची जनता गद्दारांना क्षमा करणार नाही. बाळासाहेबांच्या शिवसेनेला वनवासात पाठवण्याचे पाप एकनाथ शिंदे यांनी केले आहे, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या घटनेवर विधानसभाध्यक्षांनी भाष्य करताना उद्धव ठाकरे यांच्या काळात 2018 मध्ये शिवसेना घटनेत झालेले बदल अमान्य केले. 1999 ची निवडणूक आयोगाकडे दिलेली घटना विधानसभाध्यक्षांनी मान्य करीत मूळ पक्षावर एकनाथ शिंदे यांचा असलेला दावा योग्य ठरवला. यावर शिवसेनेची घटना एकनाथ शिंदे की भरत गोगावलेंनी लिहिली आहे. हिंदुस्तानच्या इतिहासातील हा काळा दिवस, असे संजय राऊत म्हणाले.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक आयोग चोरांचे सरदार

संजय राऊत यांनी विधानसभाध्यक्षांसोबत निवडणूक आयोगालादेखील टार्गेट केले. भाजपचे स्वप्न बाळासाहेबांची शिवसेना मातीमोल करण्याचे होते. ते काम गुजरात मॉडेलने केले आहे. निवडणूक आयोग चोरांचे सरदार असल्याचादेखील संजय राऊत म्हणाले आहेत.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT