Balasaheb Thackeray Memorial Day : कडेकोट बंदोबस्तात ठाकरे कुटुंबीयांनी घेतले बाळासाहेबांच्या स्मृतींचे दर्शन

Uddhav Thackeray News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे आणि शिंदे गटात शिवतीर्थावर राडा झाला होता.
Thackeray Family
Thackeray FamilySarkarnama

Mumbai News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचे दर्शन घेतले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही उपस्थित होते. शिवतीर्थावर गुरुवारी (ता. १६ नोव्हेंबर) घडलेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. (Thackeray family took darshan of Balasaheb's memory)

उद्धव ठाकरे यांच्यासोबत माजी मंत्री अनिल परब, खासदार अनिल देसाई, संजय राऊत, विनायक राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेना नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासगी सुरक्षारक्षकांसोबत ५० पेक्षा जास्त पोलिस अधिकारी आणि एकूण ३०० पोलिसांसह राज्य राखीव दल आणि शीघ्र कृती दलाचे जवानही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Thackeray Family
Solapur Politics : मी निवडून आलो नसतो तर शिवदारेअण्णा मंत्री झाले असते; सुशीलकुमारांनी सांगितली १९७४ ची आठवण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे आणि शिंदे गटात शिवतीर्थावर राडा झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दर्शन घेऊन गेल्यानंतर हे दोन्ही गट एकमेकांना भिडले होते. मुख्यमंत्री शिंदे हे दर्शनाला आले, त्यावेळी ठाकरे गटाचे नेते स्मृतिस्थळाची पाहणी करत होते. त्यावेळी घोषणाबाजी झाली आणि पुढे हे दोन्ही गट आमनेसामने आले होते.

दरम्यान, शिवतार्थावर घडलेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येतात. शिवसेनेचे दोन्ही गट स्मृतिदिनी बाळासाहेबांच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर येत असतात. कालच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता पोलिसांकडून घेण्यात आली होती. त्यातूनच अधिकारी आणि कर्मचारी मिळून ३५० पेक्षा पोलिस शिवतीर्थावर तैनात करण्यात आले होते.

Thackeray Family
Konkan graduate Election : 'फॉर्म कसा भरायचा, मतदान कसं करायचं'; राज ठाकरेंनी घेतला मनसैनिकांचा वर्ग

शिंदे आणि ठाकरे गटातील राड्यानंतर आज सकाळपासून शिवतीर्थावर तणावपूर्ण शांतता होती. ठाकरे कुटुंबीय सव्वाअकराच्या सुमारास शिवतीर्थावर दाखल झाले होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार, खासदार, माजी नगरसेवक मोठ्या संख्येने होते. अभिवादनानंतर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

दरम्यान, कालच्या राड्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सीसीटीव्हीतील चित्रीकरणाची मदत घेण्यात येणार आहे, असे पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.

Thackeray Family
Pawar Vs Vikhe : पवार कुटुंबीयांचा नगरकडे ओढा का?; सुजय विखेंनी सांगितले कारण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com