Mumbai News : पाच राज्यांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचा कॉन्फिडन्स वाढला आहे. आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत 'अब की बार चारशे पार' याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत 400 जागांचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
भाजप त्यासाठी देशभरातील 475 पेक्षा अधिक जागावर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळेच राज्यातील 47 पैकी 30 जागांवर दावा करणार असल्याचे समजते. भाजपकडून करण्यात आलेल्या वाढत्या जागेच्या मागणीमुळे महायुतीमधील सहकारी पक्षांना कमी जागा लढवाव्या लागणार आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला किती जागा मिळणार, याबाबत उत्सुकता आहे.
भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 284 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 303 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 400 जागांचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे पूर्ण करण्यासाठी भाजपला यावेळी देशभरात 475 पेक्षा अधिक जागावर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यानंतरच 400 जागा जिंकता येणार आहेत.
त्यामुळेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ः यावेळी भाजपला महाराष्ट्रातील 48 पैकी 30 जागांवर निवडणूक लढवायची आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यात 25 जागी निवडणूक लढवली होती. या भाजपच्या वाढत्या जागामुळे महायुतीमधील सहकारी पक्षांत संभ्रम अवस्था आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाला कमी जागांवर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे या महायुतीमधील दोन घटकपक्षांना किती जागा मिळणार, याबाबत उत्सुकता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आगामी काळात भाजप राजस्थानच्या सर्वच्या सर्व 25 जागांवर निवडणूक लढवण्याचा तयारी करीत आहे. गेल्यावेळी भाजपने राजस्थानमध्ये इतर पक्षाला एक जागा सोडली होती. त्यासोबतच झारखंडमधील सर्व 14 जागांवर भाजप (Bjp) एकटाच लढणार आहे. गेल्यावेळी भाजपने इतर पक्षाला एक जागा दिली होती.
हरियानात भाजपसोबत युती करणारा दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाने नकार दिला असून राज्यातील सर्व दहा जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे, बिहारमध्ये भाजप मित्रपक्षांसाठी केवळ नऊ ते दहा जागा सोडणार आहेत.
(Edited by Sachin Waghmare)
R...