जुई जाधव
Mumbai : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेवर विधानसभेत निकाल दिला. या निकालाची सुनावणी सुरू असताना ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे आमदार विधानसभा अध्यक्षांसमोर हजर होते. राहुल नार्वेकर यांचे निकाल वाचून पूर्ण होताच मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटातील आमदाराला शिंदे गटात येण्याचे जाहीर आमंत्रण दिले.
नार्वेकरांनी निकाल देताच एकमेकांसमोर बसलेले दोन्ही गटांच्या आमदारांपैकी सुनील शिंदेंना शिंदे गटात येण्याचं आमंत्रण उदय सामंत यांनी दिली. सामंत यांनी हाताने इशारा करत सुनील शिंदेंना 'आमच्या पक्षात या आता तुम्ही', असं आमंत्रण त्यांनी दिलं. त्यावर सुनील शिंदेंनी मिश्किल हसत आपली पाठ फिरवली.
निकाल जरी शिंदेंच्या बाजूने लागला असेल तरी देखील उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. उद्धव ठाकरे यांची निवड चुकीची असून त्यांना एकनाथ शिंदेना पक्षातून बाहेर काढण्याचा अधिकार नसल्याचा देखील राहुल नार्वेकर यांनी दिला. त्यामुळे भरत गोगावले यांचा व्हीप मान्य करत शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राहुल नार्वेकर यांनी हा ऐतिहासिक निर्णय दिल्यावर शिंदे गट आणि ठाकरे गटातील कार्यकर्ते समोरासमोर येण्याची भीती होती. शिंदेच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला.तर, दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला. राहुल नार्वेकरांच्या निर्णयाचा त्यांनी निषेध करत एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.