संदीप पंडित
Vasai - Virar : वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक गेल्या ३ वर्षापसून रखडली आहे. त्यातच या तीन वर्षात प्रशासनाचे काम सुस्त झाल्याने शहरातील समस्या वाढत आहेत. या वाढणाऱ्या समस्यांना विरोधक सत्तारूढ बहुजन विकास आघाडीला टार्गेट करत असल्याने बहुजनचे कार्यकर्ते आणि नेते चलबिचल झाले होते. आणि त्यांचा हा दबाव हितेंद्र ठाकूर यांच्यावर वाढत होता. त्यामुळेच अखेर स्वातंत्र दिनाच्या दिवशी आयोजित जनता दरबारात आलेल्या अनेक प्रश्नांवर ठाकूर आक्रमक झाल्याचे चित्र वसई विरारवासियांनी पाहिले.
वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर(Hitendra Thakur) यांचा संयम सुटला. त्यांनी भर जनता दरबारात पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांना नागरिकांचे प्रश्न सुटले नाहीत तर कार्यालयात घुसून फटकावण्याचा इशारा दिला. गेल्या तीन वर्षांपासून वसई विरार महानगरपालिकेची रखडलेली निवडणूक, पावसामुळे शहरात भरलेले पाणी, अनधिकृत बांधकामे यामुळे गेली ३० वर्षे सत्तेत असलेल्या बघून विकास आघाडीला विरोधकांनी घेरले.
त्यानंतर नागरिक त्यांच्या ह्या स्वभावावर खुश असले तरी राजकीय विरोधकांनी मात्र हितेंद्र ठाकूर यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली असून, आयुक्तांवर याबाबत पोलिसात तक्रार देण्यास दबाव देण्यास सुरुवात केली आहे. यावर आयुक्त आता कोणता निर्णय घेतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कारण गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर नसतानाही प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे विरोधक टार्गेट मात्र बहुजन विकास आघाडी(Bahujan Vikas Aaghadi)ला करत असल्याने अखेर भर जनता दरबारात ठाकूर यांनी प्रशासनाचा चेहरा जनतेला दाखवून बहुजनकडे लोकांची सहानभूती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यात ते विरोधकांच्या आरोपामुळे यशस्वी झाल्याचे दिसत आहे.
विरोधक फक्त बोलतात काही करत नसल्याने आपणच नागरिकांचे तारणहार असल्याचे दाखविण्यात ठाकूर यशस्वी झाले आहेत. असे म्हटल्यास वावगे होणार नाही. या जनता दरबारात ठाकुरांनी पहिला हात घातला तो पाणी प्रश्नाला या प्रश्नांवरून विरोधकांनी ४ महिन्यांपासून बविआला टार्गेट केले होते. या प्रश्नावर पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांच्यावर विविध प्रश्नांची सरबत्ती केली . त्यावेळी अधिकाऱ्यांकडून व्यवस्थित उत्तरे न आल्याने ठाकूर यांचा पारा चढला आणि सर्व राग पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर निघाला.
या घटनेनंतर विविध राजकीय पक्षांनी आता आयुक्तांच्या नथीतून हितेंद्र ठाकूर यांच्यावर तीर मारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अनेकांनी मारहाणीच्या धमकी विरोधात आयुक्तांनी पोलिसांत तक्रार देण्यासाठी आयुक्तांवर दबाव आणण्याचे काम सुरु केल्याचे पालिका परिसरात बोलले जात आहे. असे असले तरी आयुक्तांनी मात्र यावर मौन पत्करल्याने राजकीय पक्षाची मात्र गोची झाली आहे. आता हे प्रकरण येणाऱ्या निवडणुकी(Election)पर्यंत असेच तापत ठेवण्याचा विरोधकांचा प्रयत्न असणार आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.