Jitendra awhad sharad pawar ajit pawar Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad : अजित पवारांच्या 'त्या' विधानावर जितेंद्र आव्हाड संतापले; म्हणाले, "लाज वाटते तुमच्याबरोबर..."

Jitendra Awhad On Ajit Pawar : "...अन् या सुपाऱ्या अजित पवारांनी खूप वेळा वाजवल्यात", अशी टीका आव्हाडांनी केली.

सरकारनामा ब्युरो

कुणी भावनिक होत तुम्हाला आवाहन करतील. ही शेवटची निवडणूक असल्याचं सांगतील. खरंच, शेवटची निवडणूक कधी होणार, माहिती नाही. पण, सतत असं सांगितलं जातं. तुम्ही भावनिक होऊ नका, ही विनंती आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांना लक्ष्य केलं होतं. अजित पवारांच्या विधानावर आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

"आपल्या काकांच्या मृत्यूची वाट पाहणं, हे काय राजकारण आहे का? तुमच्याबरोबर काम केल्याची लाज वाटते," अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

( राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

"शरद पवारांच्या एखाद्या मुद्द्याची अजित पवार हवा काढायचे"

"तुमच्याबरोबर काम केल्याची आम्हाला लाज वाटते. मला तर आधीपासूनच लाज वाटत होती. कारण, अजित पवार 10 ते 15 वर्षापासून ज्या पद्धतीनं शरद पवारांशी वागलेत, हे कुणाला कळलं नाही. पण, मला बरोबर कळलं होतं. शरद पवारांचा एखादा मुद्दा चर्चेत आला, तर संध्याकाळी अजित पवार त्यातली हवा काढत होते," असा आरोपही जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

"अजित पवारांना महाराष्ट्राबाहेर कुणी ओळखत नाही"

"कधी राजीनामा, तर कधी खोट बोलायचं. या सुपाऱ्या अजित पवारांनी खूप वेळा वाजवल्यात. शरद पवार बारामतीपुरते मर्यादीत नाहीत. ते महाराष्ट्र आणि देशाचे नेते आहेत. तुम्हाला महाराष्ट्राबाहेर कुणी ओळखतही नाही," असं टीकास्र आव्हाडांनी अजित पवारांवर डागलं.

Edited By : Akshay Sabale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT