Ajit Pawar Solapur Tour : चंदनशिवेंच्या घरी जाणे अजितदादांनी का टाळले? राष्ट्रवादीतील गटबाजी ठरली वरचढ

Solapur NCP News : दिलीप माने यांच्याकडे जेवण केल्यानंतर परतीच्या मार्गावर आनंद चंदनशिवे, उमेश पाटील आणि संतोष पवार यांना घेऊन दादा सोलापूरकडे आले.
Ajit Pawar Solapur Tour
Ajit Pawar Solapur TourSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शनिवारी पहिला सोलापूर दौरा झाला. या दौऱ्यात राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा एकदा दिसून आली. त्याचा प्रत्यय शहरात आदल्या दिवशी लागलेल्या फ्लेक्सवरून येत होता. खुद्द अजितदादांसमोरही ती दिसून आली. त्याचाच फटका माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांना बसल्याचे बोलले जात आहे. दौऱ्यात उल्लेख असूनही अजितदादा चंदनशिवेंच्या घरापर्यंत पोहोचणार नाहीत, याची काळजी कोणत्या नेत्याने घेतली, याची चर्चा सोलापुरात जोरात सुरू आहे. (Why did Ajitdada avoid going to Anand Chandanshive's house?)

शिवसेना-भाजपसोबत गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीसाठी अजित पवार हे शनिवारी (ता. ३ फेब्रुवारी) सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचा दौराही रितसर झाला होता. त्यात जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा आणि त्यानंतर पक्षाचे मेळावे, तसेच माजी आमदार दिलीप माने, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि किसन जाधव यांना राखीव वेळ दिला होता. त्यात चंदनशिवे यांच्या निवासस्थानी भेट देण्याचा कार्यक्रम वगळता इतर सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडले. मात्र, चंदनशिवे यांच्या घरी जाणे अजित पवार यांनी का टाळले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Ajit Pawar Solapur Tour)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar Solapur Tour
Baramati Loksabha : शेवटची निवडणूक म्हणतील...भावनिक करतील; पण मी उभा केलेल्या उमेदवारालाच निवडून द्या; अजित पवार

एकसंघ राष्ट्रवादीमध्येही प्रचंड गटबाजी होती. अनेक जाहीरपणे आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील सर्व नेते अजितदादांसोबत आले आहेत. या नेत्यांसोबत गटबाजीही घेऊन आले आहेत. शहर अध्यक्ष निवडतानाही ती प्रकर्षाने जाणवली होती.

आमदार यशवंत माने, माजी आमदार दीपक साळुंखे आणि किसन जाधव यांचा एक गट, तर संतोष पवार, जुबेर बागवान आणि उमेश पाटील यांचा एक गट असल्याचे या दौऱ्यात स्पष्टपणे दिसले. किसन जाधव आणि दीपक साळुंखे यांच्या जाहिरातींमध्ये उमेश पाटील यांचा फोटो नव्हता, तर माजी गटनेते किसन जाधव यांच्या कार्यक्रमाला संतोष पवार आणि जुबेर बागवान हे उपस्थित नव्हते.

Ajit Pawar Solapur Tour
Shirdi Lok Sabha : रामदास आठवलेंनी सांगितली शिर्डी लोकसभा मतदारसंघ मिळण्यातील तांत्रिक अडचण

आनंद चंदनशिवे यांच्या निवासस्थानी भेट द्यावी, यासाठी उमेश पाटील, संतोष पवार आणि जुबेर बागवान हे प्रचंड आग्रही होते. प्रवीण डोंगरे यांनीही दादांना विनंती केली. दिलीप माने यांच्याकडे जेवण केल्यानंतर परतीच्या मार्गावर आनंद चंदनशिवे, उमेश पाटील आणि संतोष पवार यांना घेऊन दादा सोलापूरकडे आले. त्यामुळे पवार हे चंदनशिवे यांच्या घरी निघाले आहेत, असे सर्वांनी समज करून घेतला. मात्र, या तिघांनाही सोलापुरात सोडून अजितदादा बारामतीकडे गेल्याचे सांगण्यात येते.

Ajit Pawar Solapur Tour
Madha Loksabha : मनोहर जोशींचं सरकार रामराजेंच्या कृपेनंच चाललं ; भाजप - अजित पवार गट वाद मिटेना...

आमदार यशवंत माने, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे आणि उमेश पाटील, संतोष पवार, जुबेर बागवान यांच्या गटबाजीमुळे अजित पवार यांनी माजी नगरसेवक चंदनशिवे यांच्याकडे जाण्याचे टाळले, असे म्हटले जात आहे. मात्र, शासकीय दौऱ्यात आवर्जून उल्लेख असूनही अजितदादांना चंदनशिवे यांच्या निवासस्थानी जाण्यापासून रोखणार नेता कोण, अशी चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Ajit Pawar Solapur Tour
Ajit Pawar : अजितदादांना नेमका कशाचा तिटकारा? सोलापूर जिल्हा बँकेत आले, पण गेटवरूनच निघून गेले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com