Vishwanath Bhoir
Vishwanath Bhoir  sarkarnama
मुंबई

MLA Vishwanath Bhoir : '...तर अधिकारी, कंत्राटदारांची गय नाही', आमदार भाईरांनी भरला सज्जड दम

शर्मिला वाळुंज

Vishwanath Bhoi News : आकाशात काळे ढग दाटून येत असताना महानगरातील नालेसफाईला वेग येतोय. पावसाचे आगमन वेळेत झालं तर शहर पाण्यात जाण्याची भीती आहे. त्यामुळे राजकीय नेते एकमेकांवर चिखलफेक करतात. राजकीय नेत्यांच्या या चिखलफेकीत सरकारी 'बाबू' मात्र अलगत बाजुला होतात. हेच 'बाबू' आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निशाण्यावर आले आहेत.

कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर Vishwanath Bhoir यांनी आज (शुक्रवारी) शहरातील नाल्यांची पाहणी केली. कचऱ्याने तुंबलेले नाले पाहून भोईर यांचा पारा चढला. पाच दिवसांचा अल्टीमेटम देत. नालेसफाई जर नीट झाली नाही तर केडीएमसी अधिकारी आणि कंत्राटदारांची कोणतीही हयगय केली जाणार नाही, असा सज्जड दमच आमदार विश्वनाथ भोईर यांनी भरला.

पाऊस पडला तरी सरकारी यंत्रणा जागी होत नाही. नालेसफाईसाचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराला ही याचे काही पडलेले नाही, अशी तक्रार घेऊनच कल्याणमधील नागरिक आमदार भोईर यांच्याकडे आले. मग भोईर ही फिल्डवर उतरले. प्रत्यक्षात नालेसफाई किती झाली हे त्यांनी जाऊन पाहिले. त्यांच्या सोबत कल्याण-डोंबिवली महापालिकेचे KDMC अधिकारी देखील होते.

कल्याण पश्चिमेतील स्टेशन रोड आणि बैल बाजार येथील प्रमुख नाल्यांची पाहणी करताना भोईर यांचा पारा चढला. नाल्यांमध्ये साजलेला कचरा पाहून भोईर यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या पाहणा वेळी केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ आणि इतर अधिकारी उपस्थित होते

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अधिकाऱ्याला झापले

केडीएमसी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी नालेसफाई केली असल्याचे आमदार भोईर यांना सांगितले. मात्र नालेसफाईची पाहणी करताना तुम्ही सांगता नालेसफाई झाली मग नाल्यात हा कचरा आणि गाळ कसा काय आहे? ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणारी आणि लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणारी नालेसफाई आपल्याला मान्य नाही, असे म्हणत नवांगुळेंना धारेवर धरले.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT