Kalyan Political News : कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांंनी फेब्रुवारी महिन्यात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार केला होता. या प्रकरणात गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते. या गोळीबारानंंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. पण आता तेच गायकवाड पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे.
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आल्याने महापालिकेकडून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात नालेसोफायचे कामे सुरू आहे. या कामाची शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी कल्याण पूर्व येथील वालधुनी नदी परिसर, संतोषनगर नाला येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी या नाल्यांमध्ये, नदीमध्ये गाळ पाहून महेश गायकवाड अधिकाऱ्यांवर चांगलेच बरसले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde ठाण्यातील विकासकामांत जातीने लक्ष घालतात. आताही लोकसभा निवडणुकीत विकासासाठी महायुतीला निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. असे असतानाही त्यांच्याच ठाण्यातील केडीएमसी महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या नालेसफाईचे तीनतेरा वाजल्याची पोलखोल त्यांच्याच पदाधिकाऱ्याने केली केली.
दरवर्षी नालेसफाईचे काम होऊनही पावसाळ्यात या परिसरात शेकडो घरे पाण्याखाली जातात. हे सर्वश्रृत असतानाही दरवर्षी एकाच ठेकेदाराला काम का दिले जाते? या कामचुकार ठेकेदारावर कारवाई का होत नाही? असे प्रश्न उपस्थित करून गायकवाडांनी यंदा नालेसफाईचे काम नीट झाले नाही तर गाठ माझ्याशी आहे, असा इशाराच महापालिका अधिकाऱ्यांना दिला आहे.
कल्याण डोंबिवली Kalyan Dombivli शहरात पावसाळा तोंडावर आला असताना महापालिकेकडून ठिकठिकाणी नालेसफाई सुरू आहे. महापालिकेकडून दरवर्षी नालेसफाई केली जात असल्याचा दावा केला जातो. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातात. मात्र कल्याण पूर्वेत नालेसफाईच्या कामात कामचुकारपणा झाल्याचे महेश गायकवाडांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
गायकवाडांनी Mahesh Gaikwad अधिकाऱ्यांसमवेत कल्याण पूर्वेतील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्यावेळी वालधुनी नदी परिसरातील काम झाले नसल्याचे दिसून आले. ही बाब गायकवाडांनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. वालधूनी परिसरात नालेसफाई न झाल्याने पूर सदृश्य स्थिती निर्माण होते. याचा फटका परिसरातील नागरिकांना बसतो. यंदा तरी नालेसफाई व्यवस्थित करा, असे सांगत त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरवर्षी वालधुनी नदी परिसरात शेकडो घरे पाण्याखाली जातात. यातून येथील कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. असे असतानाही दरवर्षी नालेसफाईचे काम एकच ठेकेदाराला दिले जाते. तो काम करत नाही, मात्र त्याच्यावर कोणतेही कारवाई होत नाही. यंदा नालेसफाई झाली नाही, तर गाठ माझ्याशिवाय असा सज्जड दमच महेश गायकवाडांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.