Mla Disqualification Latest News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानपरिषद आमदार अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने विधानपरिषद आमदार अपात्र प्रकरणात नोटिशीला उत्तर देण्यासाठी एक महिन्याचा अवधी मागितला आहे.
अपात्रता प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील आमदारांना विधिमंडळाकडून 5 डिसेंबरला नोटीस जारी करण्यात आली होती. 8 दिवसांत उत्तर सादर करा, अशी नोटीस देण्यात आली होती. यावर अजित पवार गटाने उत्तर देण्यासाठी एक महिना अधिकचा कालावधी मागितला आहे. तर शरद पवार गटाकडून आमदार अपात्रतेच्या नोटीसला उत्तर सादर केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार अपात्रतेवर ऐतिहासिक निकाल येणार!
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने 10 जानेवारीपर्यंत मुदवाढ दिली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष या प्रकरणावर काय निकाल देतात याची उत्सुकता आहे. पण यावर 10 दिवसांपूर्वी म्हणजे 15 डिसेंबरला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सूचक विधान केले होते. या प्रकरणात ऐतिहासिक निकाल देणार. हा निकाल देशासाठी उदाहरण असेल, असे राहुल नार्वेकर यांनी एका अनौपचारिक गप्पांदरम्यान म्हणाले होते.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.