Avinash Jadhav MNS Sarkarnama
मुंबई

Avinash Jadhav MNS : मंत्री सरनाईकांना मोर्चातून हुसकावले; अविनाश जाधव यांची 'मनसे' प्रतिक्रिया

MNS Leader Avinash Jadhav Reacts to Pratap Sarnaik Being Ousted from Mira Bhayandar Marathi Morcha : मीरा भाईंदर मराठी माणसांच्या मोर्चातून हुसकावून लावलेले शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

Mira Bhayandar Marathi rally : मराठी माणसांनी मीरा-भाईंदरमध्ये काढलेल्या मोर्चात सहभागी झालेले शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक यांना हुसकावून लावण्यात आले. यावर मनसेचे अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'प्रताप सरनाईक यांच्याबरोबर इथं जे झालं, ते योग्य झालेलं नाही. ते मराठी माणूस म्हणून मोर्चात सहभागी झाले होते', असे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.

मीरा भाईंदर इथं अमराठींनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज मराठी माणसांनी मोर्चा काढला होता.मराठी एकीकरण समिती, मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) सेना पक्षासह स्थानिक सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक मराठी लोक मोर्चात सहभागी झाले होते. शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक मराठी माणूस म्हणून मराठी मोर्चात सहभागी झाले.

परंतु, मोर्चात सहभागी झालेल्या मंत्री सरनाईक यांना मोर्चातील मराठी माणसांच्या रोषाला समोरे जावं लागले. 'पन्नास खोके, एकदम ओके', 'गद्दार', अशा घोषणा देत तेथून हुसकावून लावण्यात आलं. मीरा-भाईंदर आल्यावर इथं हिंदी बोलावसं वाटतं, अशी (Shivsena) मंत्री सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी विधान केलं होतं. त्याचा दाखला देत, मराठी माणसांनी हा रोष व्यक्त केला.

मनसेचे स्थानिक नेते अविनाश जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांना पहाटे ताब्यात घेतलं होते. मराठी माणसांच्या मोर्चाचं आक्रमक रूप पाहिल्यानंतर, प्रशासनानं अविनाश जाधव यांच्यासह ताब्यात घेतलेल्या स्थानिक प्रमुख मनसे नेत्यांना सोडून दिलं. अविनाश जाधव मोर्चात सहभागी झाल्यावर त्यांना मंत्री सरनाईक यांच्याबरोबर झालेल्या प्रकाराची माहिती मिळाली. त्यावर त्यांनी 'मनसे' प्रतिक्रिया दिली.

सरनाईक यांच्याविषयी नरमाईची भूमिका

अविनाश जाधव म्हणाले, "प्रताप सरनाईक इथं झालं ते योग्य झालं नाही. ते इथं आले होते, ते मराठी माणूस म्हणून आला होते. गेल्या दोन दिवसांपासून ते देत असलेल्या प्रतिक्रिया आवडत नव्हत्या. परंतु आज सकाळपासून त्यांनी, मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणसांना का मोर्चा काढून दिला नाही, याबाबत बोलत होते".

मराठी माणूस म्हणून बघितलं पाहिजे होतं

'मोर्चात सहभागी होताना, त्यांनी मंत्री आणि आमदारकीची चादर बाजूला सारून मी इथं आलेलो आहे. मराठी माणूस आपल्यासोबत येत असेल, तर त्याला प्रेमानं घेतलं पाहिजे. मराठी माणसांकडे मराठी म्हणून बघनं गरजेचं आहे. आपसातील वाद-विवाद बाजूला ठेवलं पाहिजे', असे अविनाश जाधव यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT