मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आजोबा (Grandfather) झाले आहेत. राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि सूनबाई मिताली अमित ठाकरे (Mitali Thackeray) यांना आज (ता.5 एप्रिल) पुत्ररत्न झालं आहे. याबाबतची माहिती मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकवरुन दिली आहे. मिताली या ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये दाखल होत्या. राज ठाकरेंना नातू झाल्याचे समजताच ते रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत.
मोरेंनी फेसबुकवर याबाबतची माहिती देतांना आमचे साहेब आजोबा झाले, अशी पोस्ट केली तर युवराजांचं आगमन झाल्याचेही सांगत राज ठाकरेंना नातू झाल्याचं सांगितले आणि त्यांनी अमित ठाकरेंचेही अभिनंदन केले आहे.
राज ठाकरेंच्या घरी काही आठवड्यांपूर्वीच नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. नातू झाल्याने राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या आनंदी झाल्या आहेत. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या नवीन निवासस्थानी या नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी काही आठवड्यांपासून सुरु होती.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच राज हे त्यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानावरुन सहकुटुंब 'शिवतीर्थ' या नव्या निवासस्थानी वास्तव्यास गेसे आहे. त्यांच्या या नवीन घरामध्ये आता नातवांची ही चिमुकली पावलं खेळताना दिसणार आहे. अमित ठाकरेंचा विवाह २७ जानेवारी २०१९ ला मिताली बोरुडे यांच्याशी झाला होता. अमित यांच्या लग्नाला राजकीय नेत्यांसह उद्योग, चित्रपट तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. लोअर परळ येथील सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला होता.
तर २०१८ मधील डिसेंबर महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला होता. मिताली या फॅशन डिझायनर असून मिताली यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतलेले आहे. मिताली यांचे वडील संजय बोरुडे हे प्रसिद्ध सर्जन असून राज ठाकरेंच्या कंन्या उर्वशी आणि मिताली या चांगल्या मैत्रींणी आहेत. काही वर्षांपूर्वी या दोघींनी मिळून 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रॅण्डही लॉन्च केला होता. अमित ठाकरे आणि मिताली यांच्या ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले आणि त्यानंतर दोघेही विवाहबंधनात अडकले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.