Bala Nandgaonkar, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

MNS News : 'जातीला पोट असतं पण...', बाळा नांदगावकरांनी पुन्हा एकदा मनसेची आरक्षणाबाबतची भूमिका केली स्पष्ट; म्हणाले...

Jagdish Patil

Mumbai News, 08 August : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. आरक्षण हे जातीवर नव्हे तर आर्थिक निकषावर ठरवायला हवं, असं म्हणत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) आरक्षणाबाबतच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.

मनसेने विधानसभेसाठी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबईतील शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीबाबत बोलताना नांदगावकर यांनी मतदारसंघातील नागरिक मला साथ देतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) म्हणाले, "बाळासाहेबांनी लावलेले रोपटं आज मोठं झालं आहे. त्यांनी मला महापालिकेत, विधानसभेत पाठवलं. राज साहेबांनी पून्हा विश्वास दाखवला. बाळासाहेबांच्या अनेक आठवणी आहेत. 1995 ला त्यांनी मला आशीर्वाद दिला. आई-वडिलांनी जन्म दिला असला तरी बाळासाहेबांनी मला खरा आधार दिला", अशा शब्दात त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

तसंच यावेळी त्यांनी लोक आपणाला साथ देतील असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, "मला पूर्ण खात्री आहे नागरिक मला साथ देतील. 2009 ला नागरिकांनी माझावर विश्वास दाखवला. मी अनेक चांगले प्रकल्प आणले. आमच्याच शिवसेनेच्या (Shivsena) लोकांनी त्यांला विरोध केला. मात्र, अजय चौधरी हे निवडून आल्यानंतर मी कधीही त्यांना विरोध केला नाही.

उलट फोन करून अभिनंदन केलं. मला केवळ वॉटर मीटर आणि गटर यापर्यंत मर्यादित रहायचं नाही. तर अनेक पुर्नविकास रखडलेले आहेत. बेरोजगारीची समस्या आहे. जेजे करता येईल ते करणार आहे. अनेक घरातील मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

आरक्षणाची गरज लागणार नाही...

तसंच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबत बोलताना "महाराष्ट्रात इतक्या मुबलक गोष्टी आहेत की आपल्या महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाहीये" असं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना नांदगावकर म्हमाले, राज ठाकरेंनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. आरक्षण हे जातीवर नव्हे तर आर्थिक निकषावर ठरवायला हवं. जे बाळासाहेबांनीही यापूर्वी बोलून दाखवलं आहे.

जर मनसेची सत्ता आली तर आरक्षणाची गरज लागणार नाही. त्यामुळेच ते तसे म्हटले असावेत. जातीला पोट असतं पोटाला जात नसते, अशा शब्दात नांदगावकर यांनी पुन्हा एकदा मनसेची आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करत राज यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT