Chitra Wagh Mumbai Sanjay Rathod
Chitra Wagh Mumbai Sanjay Rathod sarkarnama

Chitra Wagh : मंत्री संजय राठोड प्रकरणात चित्रा वाघ यांना न्यायालयाने खडसावले, ' जनहित याचिकेच्या माध्यमातून राजकारण...'

Chitra Wagh Mumbai High Court Sanjay Rathod : एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
Published on

Chitra Wagh News : पुण्यामध्ये एका तरुणीचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. ही घटना फेब्रुवारी 2021 मध्ये घडली होती. या प्रकरणात एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

मात्र, ही याचिका न्यायालयाने निकाली काढावी किंवा ती मागे घेण्याची मुभा द्यावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी न्यायालयाकडे केली होती. त्यांच्या या भूमिकेचा समाचार घेत त्यांना न्यायालयाने खडसावले.

राजकारणी जनहित याचिकांच्या माध्यमातून राजकारण करत असून न्यायालयांना त्यात विनाकारण ओढत आहेत. राजकारण करण्याचा हा मार्ग नाही आणि तो कधीही स्पृहणीय नाही, असे ताशेरेही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने चित्रा वाघ यांच्यावर ओढले.

Chitra Wagh Mumbai Sanjay Rathod
Dharmarao Baba Atram: शरद पवार यांना वाटलं असतं तर अजितदादा मुख्यमंत्री झाले असते...

बदललेल्या राजकीय स्थितीनुसार तुमची भूमिका बदलते आणि राजकारण करण्यासाठी जनहित याचिकांचा माध्यम म्हणून वापर करून न्यायालयांना त्यात ओढले जात आहे, असे खडे बोल देखील न्यायालयाने सुनावले. न्यायालयाने खडसावल्याने चित्रा वाघ यांनी आपल्या वकिलाच्या मार्फत याचिका मागे घेणार नसल्याचे न्यायालयाला सांगितल्याची माहिती आहे.

नेमके काय प्रकरण?

टिकटॉक व्हिडीओसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील तरुणीचा 8 फेब्रुवारी 2021 रोजी इमारतीवरून पडून मृत्यू झाला. या तरुणाचे नाव मंत्री संजय राठोड यांच्यासोबत जोडले गेले. राठोड यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. राठोड यांना महाविकास आघाडी सरकारमधील आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला. राठोड यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी वाघ यांनी 2021 मध्येच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Chitra Wagh Mumbai Sanjay Rathod
BJP Vs Shivsena UBT : भाजपचं मिशन मुंबई-कोकण! विधानसभेला ठाकरेंच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्यासाठीचा प्लॅन तयार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com