Kishor Shinde and Deepali Sayyed  Sarkarnama
मुंबई

MNS On Deepali Sayyed: दीपाली सय्यद तुमचा पक्ष कुठचा ? मनसेच्या किशोर शिंदेंचा तासाभरातच पलटवार

MNS News: जेवढे रस्त्यांवर खड्डे, तेवढेच मनसेचे कार्यकर्ते, अशी टीका दीपाली सय्यद यांनी 'मनसे'वर केली होती.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची तुलना खड्ड्यांच्या आकड्याशी करणाऱ्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी अखेर मनसेचा रोष ओढावून घेतलाच. सय्यद यांच्या टिप्पणीला ‘मनसे’ स्टाईलने उत्तर देत, पक्षाचे नेते किशोर शिंदेंनी ‘दिपाली सय्यद, तुमचा पक्ष कुठचा, असेन; तर त्या पक्षाचे नाव सांगा. नसेन; तर तुम्हाला कोणीच पक्षात का घेत नाही, हेही सांगा, अशी विचरणा करीत, शिंदेंनी सय्यद यांना विचार करायला भाग पाडले आहे. मात्र, शिंदेंच्या या प्रश्‍नांना सय्यद कुठेच कमी पडणार नाहीत, त्या चपखल उत्तर देऊन शिंदेंचा समाचार घेतील, हे निश्‍चित आहे.

मुंबई-गोवा मार्गासह राज्यभरातील रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहे. त्यावरून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन सुरू केली आहेत. त्यात कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनसेच्या या आंदोलनावर अभिनेत्री दीपली सय्यद यांनी बोचऱ्या शब्दांत टीका करीत, थेट राज आणि अमित ठाकरेंना लक्ष्य केले.

राज्यात मनसेचे जेवढे मनसेचे कार्यकर्ते आहेत, तेवढेच खड्डे असल्याचे सांगून सय्यद यांनी राज यांच्या पक्षाचे मोजमाप करून टाकले. खड्डे बुजविण्याचे काम दोन दिवसांचे आहे, त्यासाठीच्या आंदोलनावरून महिनाभर तुरुंगात जाऊन देशाचे नुकसान का करता, असा तिरकस सवालही सय्यद यांनी केला. युवा नेत्याला घराबाहेर काढून कामाला लावा, हे सांगायलाही सय्यद घाबरल्या नाहीत. सय्यद यांची ही टीका जिव्हारी लागल्याने मनसेच्या गोटातूनही सय्यद यांना जशास तसे उत्तर दिले जात आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटात असताना दीपाली सय्यद यांनी बंडखोरांवर नेहमीच टीका केली. मुख्यमंत्री शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर सय्यद यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांची बाजू मांडत राहिल्या. त्यानंतर मात्र, ठाकरे गटात अस्वस्थ झालेल्या सय्यद ठाकरेंच्या शिवसेनेत थोड्याशा ‘बॅकफूट’वर गेल्या. तेव्हा मात्र, त्या शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत दिसल्या. मात्र, त्यांचा प्रवेश झाला नाही. नेमके, या मुद्यावरून मनसेचे नेते किशोर शिंदे यांनी सय्यद यांना दोन प्रश्‍न विचारले आहेत.

शिंदे म्हणाले,‘‘प्रत्येकाच्या मनात घर केलेल्या मनसेवर बोलणाऱ्या सय्यद यांनी आधी आपला पक्ष सांगावा. मग, इतररांवर बोलावे. त्यांची मानसिक स्थिती लक्षात घेऊनच त्यांना कोणीच कोणत्याच पक्षात घेत नाही. हे त्यांनी विसरू नये, लोकांची कामे काय असतात, हे सय्यद यांना ठाऊक तरी आहे का.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT