Nitin Sardesai Latest News
Nitin Sardesai Latest News Sarkarnama
मुंबई

'आम्हाला जेवढं दाबाल त्याच्या दुप्पट वेगाने आम्ही उसळी घेऊ, लावा ताकद!'

सरकारनामा ब्यूरो

Nitin Sardesai: महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) 'सल्तनत' लाख बुरा चाहे तो क्या होता है? वही होता है जो मंजूर ए कानून होता है..,अश्या शब्दात मनसे नेते नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना महाविकास आघाडी सरकारकडून मानसिक त्रास दिला जात असून खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाला. पण आमचे महाराष्ट्र सैनिक या सगळ्याला पुरून उरले. जेल भोगली, तडीपारी भोगली आणि कोणताही अनुचित प्रकार न करता महाराष्ट्रातील अनाधिकृत भोंग्याचा आवाज बंद करून सुद्धा दाखवला. आम्हाला दाबायला जेवढी ताकद लावाल त्याच्या दुप्पट वेगाने आम्ही उसळी घेऊ..लावा ताकद, असा थेट इशारा सरदेसाईंनी राज्य सरकारला दिला आहे. (MNS Leader Nitin Sardesai Latest News)

गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्याच्या प्रश्नावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मनसे आणि महाविकास आघाडी सरकारमधील वाद चांगलाच पेटला. राज यांच्या औरंगाबादच्या सभेनंतर मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा बजावत धरपकड केली होती. यावरून सरदेसाई यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून राज्य सरकारवर टीका केली आणि भोंग्याच्या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे कौतूक केले आहे. त्याबरोबर महाविकास आघाडी सरकारने मनसे कार्यकर्तांवर सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप करत सरकारला इशाराही दिला आहे.

नितीन सरदेसाई आपल्या फेसबुक पोस्टमध्येे म्हणाले की, म.वि.आ. 'सल्तनत' लाख बुरा चाहे तो क्या होता है ? वही होता है जो मंजूर ए कानून होता है.. 2 मे पासून महाराष्ट्रातील मविआ सल्तनत ने आम्हा महाराष्ट्र सैनिकांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावला होता. अनेकांना स्थानबद्ध केले, अनेकांना अटक केली, जेल मध्ये टाकले, आमच्या पदाधिकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास दिला (अजूनही देत आहेत). या व अशा अनेक प्रकारे आमचे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाले पण आमचे महाराष्ट्र सैनिक या सगळ्याला पुरून उरले. जेल भोगली, तडीपारी भोगली आणि कोणताही अनुचित प्रकार न करता महाराष्ट्रातील अनाधिकृत भोंग्याचा आवाज बंद करून सुद्धा दाखवला.

महाराष्ट्रातील 'सल्तनत' ने पोलिसांवर दबाव टाकून नको त्या गुन्ह्यांची कलमे लावून आमच्या महाराष्ट्र सैनिकांना अडकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण आम्ही जसे रस्त्यावर संघर्ष करून न्याय मिळवतो त्याच प्रमाणे आम्ही न्यायालयीन लढाई सुद्धा तेवढ्याच ताकदीने लढुन, संघर्ष करून, न्याय मिळवण्यात यशस्वी झालो. म. वि. आ. सल्तनतच्या या दमनशाहीला अंगावर घेऊन, महाराष्ट्रातील जनतेला आवाजाच्या त्रासातून मुक्त करणार्‍या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना माझा सलाम !! कायदेशीर प्रक्रियेत महाराष्ट्र सैनिकांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार्‍या सर्व वकील मंडळी व महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्ष यांचे विशेष आभार. आपले सहकारी अडचणीत असल्याने त्यांच्या सुटकेसाठी धावपळ करणार्‍या सर्व महाराष्ट्र सैनिकांना साष्टांग दंडवत. शेवटी एवढंच सांगेन, आम्हाला दाबायला जेवढी ताकद लावाल त्याच्या दुप्पट वेगाने आम्ही उसळी घेऊ...लावा ताकद जय महाराष्ट्र!, अश्या शब्दात त्यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांचा बहूचर्चित अयोध्या दौरा हा स्थगित करण्यात आला आहे. त्यांच्या या दौऱ्यावरुन चांगलच राजकारण तापलं होतं. भाजपचे अयोध्येचे खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी मगच अयोध्येला य़ावे, अशी भूमिका घेतल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागलं होत. मात्र, त्यांनी हा दौरा तुर्तास रद्द् केल्याची घोषणा करत पुण्यात रविवारी सभेची घोषणा करत मनसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज यांनी केलं आहे. आता या सभेत रविवारी राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT