Raju Patil And Subhash Bhoir Sarkarnama
मुंबई

Raju Patil And Subhash Bhoir : आमना-सामना ठरलेला असतानाच, आजी-माजी आमदार एकत्र...

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात शिवसेना ठाकरे पक्षाविरुद्ध मनसे पक्ष, असे वातावरण तापले आहे. परंतु कल्याण ग्रामीणमध्ये मात्र दोन्ही पक्षाचे आजी-माजी आमदार कामगारांच्या प्रश्नांवर एकत्र आलेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेचे आमदार राजू पाटील यांची शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्यासोबत कडवी लढत होण्याची चिन्हे आहेत. त्याआधी हे दोघं एकत्र आल्याने भविष्यात नेमक्या काय राजकीय हालचाली होतात याकडे लक्ष लागले आहे.

27 गावातील कामगारांना केडीएमसीत समाविष्ट करुन घेण्यासाठी केडीएमसी मुख्यालयावर सफाई कामगारांनी सोमवारी मोर्चा काढला. 27 गाव डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारांना महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करावे, अशी मागणी 2015 सालापासून केली जात आहे. मात्र जवळपास 500 सफाई कामगारांना महापालिकेने अद्याप सेवेत समाविष्ट करुन घेतलेले नाही. त्या विरोधात आज सफाई कामगारांनी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.

या मोर्चाला कल्याण ग्रामीणचे मनसेचे (MNS) आमदार राजू पाटील, शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार सुभाष भोईर यांसह काँग्रेसचे नेते संतोष केने यांनी पाठिंबा दर्शवित मोर्चात सहभागी झाले. लवकरात लवकर सफाई कामगारांना महापालिकेच्या सेवेत समावून घेतले पाहिजे, असे विधान माजी आमदार सुभाष भोईर यांनी केले. तर सर्व प्रकारचे कर भरुन देखील आमच्या 27 गावांवर महापालिकेकडून सातत्याने अन्याय सुरू आहे. कामगारांच्या आंदोलनास पाठिंबा देण्याकरीता मी आंदोलनात सहभागी झालो असल्याची प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

शिवसेना (Shiv Sena) ठाकरे पक्षाचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माहिती दिली की, 12 एप्रिल 2017 साली सरकारकडे मागणी केली. त्यानंतर 2019 सालीही हा विषय सरकारकडे मांडला होता. तत्काल राज्यमंत्री योगेंद्र सागर यांच्याकडे मागणी केली होती. या कामगारांना केडीएमसी समावून घ्यावे, अशी मागणी केली आहे.

याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील या आंदोलनास जाहिर पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही. तोपर्यंत त्यांना मनसे पाठिंबा आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. 27 गावातील नागरीकांकडून कर वसूली केली जाते. त्यांना कोणत्या सोयी सुविधा पुरविल्या जात नाही. त्यांचे प्रश्न सोडविले जात नाही. 27 गावांवर सातत्याने अन्याय होत राहिला आहे. सफाई कामगारांची मागणी लवकर मान्य करा, असे सांगितले.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर उमेदवारीचे प्रमुख दावेदार आहेत. तर मनसे पक्षाकडून आमदार राजू पाटील प्रमुख दावेदार आहेत. सुभाष भोईर पुन्हा एकदा सक्रिय झाले असून आज मोर्चात ते सहभागी झाले. या दोन्ही उमेदवारांत कडवी लढत होण्याची शक्यता आहे. ठाण्यात ठाकरे गट व मनसे यांच्यात वाद उफाळून आला असताना कल्याण ग्रामीणमध्ये मात्र ग्रामस्थांच्या मागण्यांसाठी ते एकत्र आले यामुळे पुढे राजकीय वातावरण कोणते वळण घेते हे पहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT