Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray : शिक्षकांनी निवडणुकीचं काम करू नये; निवडणूक आयोग पाच वर्षे झोपा काढतं का ? राज ठाकरे भडकले

Raj Thackeray On Election Commission : "कोणत्याही शिक्षकांनी निवडणुकीचं काम करू नये, कोण कारवाई करतं बघतो...", राज ठाकरेंचा थेट निवडणूक आयोगाला इशारा

Ganesh Thombare

Mumbai News: लोकसभा निवडणुकीची प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली असून, राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात लगबग वाढली आहे. निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जे शिक्षक या कामासाठी हजर राहणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

आता याच मुद्द्यांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. कोणत्याही शिक्षकांनी निवडणुकीचं काम करू नये, कोण कारवाई करतं बघतो, पाच वर्षे निवडणूक आयोग झोपा काढतं का ?, असे सवाल करत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला खडेबोल सुनावले आहेत. (Loksabha Election 2024 )

"निवडणूक आयोगावरच कडक कारवाई केली पाहिजे. पाच वर्षे निवडणूक आयोग झोपा काढतं का ? कोणत्याही शिकक्षकांनी निवडणुकीच्या कामासाठी रुजू होऊ नये. पाच वर्षांत निवडणूक आयोग या कामासाठी लोकं का शोधत नाही ? जर शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी वेळेत हजर झाले नाही तर शिक्षकांवर हक्कभंगाची कारवाई करता, मग निवडणूक आयोगावर हक्कभंग का आणू नये ? पाच वर्षे तुम्ही काय केलं ?," अशा शब्दांत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सुनावलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी असतात. शिक्षक जर या कामासाठी गुंतले, तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण ? असा सवाल करत यासंदर्भात आमच्या पक्षाचे नेते, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतील. तोपर्यंत कोणत्याही शिक्षकांनी निवडणुकीच्या कामासाठी रुजू होऊ नये, शिक्षकांवर कोण हक्कभंग आणतं ते बघतो," असा थेट इशारा राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिला.

"जर या देशात पाच वर्षांनी निवडणूक येते. हे निवडणूक आयोगाला माहिती असूनही आयोग काही करत नाही, मग याची आधीच तयारी करायला नको का ? ही काय देशाची पहिली निवडणूक आहे का, आयोगाला पाच वर्षांत लोकं उभी करता येत नाहीत का ?," असे अनेक सवाल राज ठाकरेंनी आयोगाला केले.

(Edited By-Ganesh Thombare)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT