Mumbai News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच आता मनसे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात हालचालींनादेखील वेग येताना पाहायला मिळत आहे.(Raj Thackeray and Aashish Shelar Meeting)
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीत राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलार राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याची माहिती आहे. या भेटीनंतर मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, भाजपसोबत युती करण्यासाठी राज ठाकरे सकारात्मक असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. मनसे भाजपसोबत युती करण्याचा केवळ अंतिम निर्णय होणं बाकी असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा अंतिम निर्णय काय असणार ? हे लवकरच समोर येणार आहे.
काही दिवसांपूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेत जवळपास एक तास चर्चा केली. या बैठकीत मनसे भाजपसोबत गेल्यास फॉर्म्युला काय असेल, या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सध्या महाराष्ट्रात युतीमध्ये भाजपबरोबर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आहे. यातच आता मनसेही युतीमध्ये सहभागी होण्याची चर्चा आहे. यासंदर्भात मनसेच्या नेत्यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, यावर राज ठाकरे काय बोलतात, ते औत्सुक्याचे असणार आहे.
(Edited By-Ganesh Thombare)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.