Shivsena Maha Adhiveshan : एकनाथ शिंदे महाअधिवेशनातून वातावरणनिर्मिती करण्यात यशस्वी; पण 'हे' चॅलेंज कसे पेलणार?

Kolhapur Politics : विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना एकसंघ होती. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात सेनेचे सहा आमदार झाले. पण, २०१९ ला यापैकी पाच आमदारांचा पराभव झाला, तोही शिवसेना एकसंघ असतानाच.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पहिलेच अधिवेशन कोल्हापुरात, त्याच्या दुसच्या दिवशी शिंदे यांनी जंगी सभेच्या माध्यमातून फुंकलेले लोकसभेचे रणशिंग आणि त्यामुळे झालेली वातावरणनिर्मिती टिकविणे, हे शिवसेनेसमोरचे आव्हान असेल. (Shivsena Maha Adhiveshan )

कोल्हापूरचा राजकीय इतिहास पाहता लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसमोर आव्हानांचा डोंगर आहे, तो कसा भेदला जाईल, याविषयीची उत्सुकता आहे. दरम्यान, पन्नास खोके-एकदम ओके, गद्दार, चोर, असे आरोप खोडून काढण्याचा आणि उद्धव ठाकरेंना असणारी सहानुभूती कमी करणे, शिंदे गटावरील आरोपांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने झाला. त्यालाही कितपत प्रतिसाद मिळतो, यासाठी लोकसभा निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. (Loksabha Election 2024)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde
Madha Loksabha : विजयदादांच्या उपस्थितीतच जयसिंह मोहिते पाटलांचा माढ्यातून लोकसभा लढविण्याचा निर्धार

महाअधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेनेने गर्दी खेचण्यात, चर्चा घडवून आणण्यात आणि वातावरणनिर्मिती करण्यात यश मिळविले असले तरीही हे वातावरण मतपेटीपर्यंत टिकविण्याचे आव्हान असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रतील खासदारांबाबत जनतेत असलेली भावनाच खऱ्या अर्थाने मतपेटीतून उतरण्याची शक्यता जनमानसांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे उमेदवार कोण असेल? यावरच लोकसभेचे आणि पुढील विधानसभेचे गणित शिवसेनेला यश-अपयश दाखवून देईल, असे दिसून येते.

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना एकसंघ होती. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात सेनेचे सहा आमदार झाले. पण, २०१९ ला यापैकी पाच आमदारांचा पराभव झाला, तोही शिवसेना एकसंघ असतानाच. आता शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत, अशा परिस्थितीत पहिल्यांदा लोकसभेतच ताकद दाखवण्याच्या दृष्टीने महाअधिवेशन आणि सभा कितपत फायदेशीर होईल, याचाही फैसला होणार आहे.

Eknath Shinde
Vilasrao Deshmukh : विधान परिषदेला अर्ध्या मताने पराभव ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : विलासराव देशमुख

यापूर्वा कोल्हापुरात शिवसेनेला खासदार मिळाला नसला तरी सहा आमदार मिळाले होते. मात्र, आज शिवसेनेचे जिल्ह्यातून दोन खासदार आहेत. मात्र, आमदारांची संख्या घटली आहे. मुख्यमंत्री शिंदे ज्या तळमळीने लोकांमध्ये मिसळतात, ती त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांकडे फारशी दिसून येत नाही. याचे धडे महाअधिवेशनाच्या निमित्ताने तीन सत्रांमध्ये टप्प्याटप्प्याने नेते, जिल्हाप्रमुख, कार्यकर्ते यांना दिले आहेत.

Edited By : Vijay Dudhale

R

Eknath Shinde
Solapur NCP : चारच दिवसांपूर्वी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश अन्‌ थेट महापौर होण्यासाठी शुभेच्छा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com