L K Advani, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray Tweet : राज ठाकरेंकडून अडवाणींचे अभिनंदन ! 'देर आए दुरुस्त आए'चीही केंद्र सरकारला कानपिचकी...

Amol Sutar

Raj Thackeray Tweet : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना 'भारतरत्न' हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'एक्स'वरती ट्विट करत त्यांचे अभिनंदन केले. मात्र, गेली 10 वर्ष केंद्रात निर्विवाद सत्ता हाती असताना, ज्यांच्यामुळे भाजप आज ज्या स्थानावर आहे त्या व्यक्तीला हा सर्वोच्च सन्मान याआधीच मिळायला हवा होता, अशी खंत ठाकरे यांनी ट्विटमधून उपस्थित केली.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाच्या प्रमुख संस्थापकांपैकी एक लालकृष्ण अडवाणी यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान घोषित झाल्याबद्दल त्यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनंदन केले. तसेच केंद्र सरकारचं देखील अभिनंदन त्यांनी केले. परंतु गेली 10 वर्ष केंद्रातील निर्विवाद सत्ता हाती असताना, ज्यांच्यामुळे भाजप आज ज्या स्थानावर आहे त्या व्यक्तीला हा सर्वोच्च सन्मान याआधीच मिळायला हवा होता, अशी खंत राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमधून व्यक्त केली आहे.

तर हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, असे म्हणत केंद्र सरकारला टोला लगावला आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले, करोडो भारतीयांचं आणि अनेक पिढ्यांचं, राममंदिराचं स्वप्न पूर्ण झालं. त्यात मोलाचा वाटा हा अडवाणींचाच आहे. त्यांनी हे करताना स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावली असून राजकीय अस्पृश्यता आणि उपेक्षा त्यांनी सहन केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

तसेच रथयात्रेतून अडवाणींनी देशातील हिंदूंची अस्मिता जागृत केली. यातूनच भारतीय जनता पक्षाचा उदय झाला, पण हे करताना 'अब की बारी अटलबिहारी' म्हणण्याइतका मनाचा मोठेपणा हा अडवाणींकडे असल्याचे ठाकरे यांनी आपल्या ट्विटमधून सांगितले. यातून अडवाणींनी पक्षासाठी दिलेले योगदान अधोरेखित होते.

ठाकरे पुढे म्हणाले, देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आजपर्यंतच राजकारण पाहिलेले नेते म्हणून अडवाणींचा उल्लेख करता येईल. देशातील राजकारणाला वळण देणाऱ्या या ज्येष्ठ नेत्याचं या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन !, असे ट्विट ठाकरे यांनी केले.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT