Raj Thackeray Ganga Water Controversy Sarkarnama
मुंबई

MNS Vs Shivsena : "गंगाजल शुद्धच, पण..."; थेट शिवसेना भवनासमोर बॅनर लावत शिंदेंच्या शिवसेनेनं राज ठाकरेंना डिवचलं

Samadhan Sarvankar Banner Controversy : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी महाकुंभ मेळ्यातील गंगा नदीच्या पाण्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राज्यासह देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. अशातच त्यांनी गुढीपाडवा मेळाव्यात पुन्हा एकदा गंगा नदीच्या प्रदुषित पाण्याचा मुद्दा उपस्थित केला.

Jagdish Patil

Mumbai News, 02 Apr : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाकुंभ मेळ्यातील गंगा नदीच्या पाण्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राज्यासह देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. अशातच त्यांनी गुढीपाडवा मेळाव्यात पुन्हा एकदा गंगा नदीच्या प्रदुषित पाण्याचा मुद्दा उपस्थित केला.

त्यावरूनच आता काही हिंदुत्ववादी नेत्यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. तर राज यांच्या याच वक्तव्यावरून सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. समाधान सरवणकर यांनी शिवसेना भवनासमोर मोठा बॅनर लावत राज यांना डिवचलं आहे.

'गंगाजल शुद्धच आहे, पण काहींच्या विचारांचं काय?' असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज यांना टोला लगावला आहे. शिवसेना भवनासमोर लावलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाकुंभ मेळ्यात गेले होते तेव्हाचे काही फोटो लावण्यात आले आहेत.

या बॅनवर लिहिलं आहे की, 144 वर्षांनी आलेल्या महाकुंभ सोहळ्यात जगभरातील 60 कोटींहून अधिक हिंदू बांधवांनी त्रिवेणी संगमात स्नान करून अखंड हिंदू एकात्मतेचा संदेश दिला. कुंभमेळा हे केवळ श्रद्धेचे नव्हे तर हिंदू संस्कृतीच्या गौरवशाली भव्यतेचे जिवंत प्रतीक आहे. हा क्षण अभिमानाचा आणि गौरवाचा होता.

हा क्षण हिंदूंच्या एकजुटीचा होता, असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. शिवाय 'गंगाजल शुद्धच आहे, पण काही लोकांच्या विचारांचं काय?' असा प्रश्न उपस्थित करत अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना टोला लगावला आहे. त्यामुळे सरवणकरांच्या या बॅनरला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशा पद्धतीने उत्तर देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राज ठाकरे नेमंक काय म्हणाले?

राज ठाकरे (Raj Thackeray) गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना म्हणाले, "बाळा नांदगावकर कुंभ मेळ्यातून येताना माझ्यासाठी गंगेचं पाणी घेऊन आले होते. पण ते पाणी मी प्यायलो नाही. त्यानंतर मात्र नव्याने वारं शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं की मी कुंभ मेळ्याचा अपमान केला. पण आपल्या देशातील नद्यांची अवस्था भीषण झाली आहे. कुंभ मेळ्यासाठी कोट्यवधी लोक गेले होते. या लोकांची विष्ठा नदीच्या पाण्यात मिसळली असेल.

मग ते पाणी शुद्ध कसं असू शकतं? तिथे अंघोळ केलेले लाखो लोक आजारी पडले. हे मला तिथल्याच लोकांनीच सांगितलं. कुंभ मेळ्याच्या अपमानाचा प्रश्न नाही. तर प्रश्न पाण्याचा आहे. आपल्या नैसर्गिक गोष्टींवर अशाप्रकारचा धर्म आडवा येत असेल तर या धर्माचं काय करायचं ? आपल्या गोष्टीत आपणच बदल करायला पाहिजे."

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT