Waqf Amendment Bill : 'वक्फ' विधेयकावर सरकारची अग्निपरीक्षा? भाजपकडे नाही बहुमत; काय आहे लोकभेतील 'नंबर गेम'?

Waqf Amendment Bil NDA Vs India Alliance Numbers Game : सध्या लोकसभेतील सदस्यसंख्या 542 आहे. भाजपकडे सर्वाधिक 240 सदस्य आहेत. स्वबळावर भाजपकडे हे विधेयक पास करण्यासाठी बहुमत नाही.
Waqf Amendment Bill Narendra Modi
Waqf Amendment Bill Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

Waqf Amendment Bill News : लोकसभेमध्ये आज (बुधवारी) वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहे. या विधेयकावर मतदान होणार आहे. मात्र, हे विधेयक स्वबळावर पास करण्या येवढे संख्याबळ भाजपकडे नाही. लोकसभेमध्ये भाजपकडे 240 सदस्य आहेत. तर, विधेयक मंजुर होण्यासाठी 272 सदस्यांच्या पाठींब्याची आवश्यकता आहे.

लोकसभेत एनडीचे विरोधात इंडीया आघाडी असणार आहे. इंडिया आघाडीचा विचार केला असताना काँग्रेस हा इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेसकडे लोकसभेत 99 सदस्य आहेत. त्यानंतर अखिलेशकुमार यादव यांच्या समाजवादी पक्षाकडे सर्वाधिक सदस्य आहे. विरोधकांचे लोकसभेत संख्याबळ 235 आहे.

Waqf Amendment Bill Narendra Modi
Maharashtra IAS transfers : महायुती सरकारचा बदल्यांचा धडाका कायम; राजेंद्र भारुड, निधी पांडे यांसह 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

एनडीएकडे बहुमत

सध्या लोकसभेतील सदस्यसंख्या 542 आहे. भाजपकडे सर्वाधिक 240 सदस्य आहेत. स्वबळावर जरी भाजपकडे हे विधेयक पास करण्यासाठी बहुमत नसले तरी भाजप नेतृत्व करत असलेल्या एनडीएची सदस्य संख्या मिळून 294 आहे. त्यामध्ये चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पक्षाचे सदस्य आहेत. त्यामुळे एनडीच्या सदस्यांच्या मदतीने हे विधेयक भाजप बहुमताने मंजुर करून घेऊ शकतो.

नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या मागण्या मान्य करत भाजपकडून विधेयकामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे टीडीपी आणि जनता दल संयुक्त यांच्याकडून विधेयकाच्या बाजुने मतदान करण्यासाठी व्हिपही जारी करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष्य

इंडिया आघाडीसोबत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वफ्त विधेयकावर काय भूमिका घेणार याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे. 9 खासदार असलेला पक्ष विधेयकाच्या बाजुने मतदान करणार की विरोधात याची उत्सुक असणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार? असे म्हटले आहे.

राज्यसभेत काय स्थिती?

राज्यसभेत भाजपकडे सर्वाधिक 98 सदस्य आहेत. तर, एनडीएकडे 115 सदस्य आहेत. तसेच सहा राष्ट्रपती नियुक्त सदस्य देखील आहेत. वक्फ विधेयक राज्यसभेत पास होण्यासाठी 119 सदस्यांची आवश्यकता आहे. विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक 27 सदस्य आहेत. तर, इंडिया आघाडीकडे एकुण 85 सदस्य आहेत.

लोकसभेतील बलाबल

एनडीए - 294

इंडिया आघाडी - 235

Waqf Amendment Bill Narendra Modi
Goa Politics: भाजप - महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा वाद पोहोचला दिल्ली दरबारी; ढवळीकर बंधुंची बीएल संतोष यांच्याशी चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com