Maharashtra IAS transfers : महायुती सरकारचा बदल्यांचा धडाका कायम; राजेंद्र भारुड, निधी पांडे यांसह 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Transfer Orders : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन 4 महिन्यांहून अधिक कालावधी होऊन गेला आहे, तरीही प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
IAS.jpg
IAS.jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सुरु असलेला आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. मागच्याच आठवड्यात पाच प्रमुख आयएएस (IAS) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.आता राज्य सरकारकडून 7 प्रमुख अधिकाऱ्यांचे बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं मंगळवारी(ता.1 एप्रिल) पुन्हा एकदा सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.त्यात मुंबईतील उद्योग संचलनालयात अतिरिक्त विकास आयुक्तपदी राजेंद्र भारुड तर लघुउद्योग खात्याच्या व्यवस्थापक संचालकपदी वरिष्ठ आयएएस अधिकारी निधी पांडे यांची बदली करण्यात आली आहे.

तसेच पालघरच्या जिल्हाधिकारीपदी इंदुराणी जाखर आणि रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेहा भोसले यांची बदली करण्यात आली आहे.याचवेळी लक्ष्मी नारायण मिश्रा यांची एमएसआरडीसीमध्ये सहाय्यक व्यवस्थापकपदी व नागपूरमध्ये रोजगार हमी योजनेच्यापदी भारत बास्टेवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS.jpg
Goa Politics: भाजप - महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा वाद पोहोचला दिल्ली दरबारी; ढवळीकर बंधुंची बीएल संतोष यांच्याशी चर्चा

बदली झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे :

1. इंदुराणी जाखर - पालघर जिल्हाधिकारी

2 - वैष्णवी बी - अतिरिक्त आयुक्त, नागपूर मनपा

3. भारत बास्टेवाड - रोजगार हमी योजना, नागपूर

4 . राजेंद्र भारूड - अतिरिक्त विकास आयुक्त, उद्योग

5. नेहा भोसले - रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी

6. लक्ष्मी नारायण मिश्रा - जॉईन्ट एमडी, एमएसआरडीसी

7. निधी पांडे - व्यवस्थापक संचालक, लघुउद्योग

IAS.jpg
Ram Shinde On Jankar : ‘चारदा निवडणूक हरल्यावर ईव्हीएम बरोबर होती; पाचव्यांदा जिंकल्यावर म्हणाले ‘ईव्हीएम चुकली’: राम शिंदेंचा उत्तम जानकरांना टोला

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन 4 महिन्यांहून अधिक कालावधी होऊन गेला आहे, तरीही प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. अशातच (ता.25) मार्च पुन्हा एकदा 5 IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले आहेत.यामध्ये सांगलीच्या आयुक्तांसह नागपूरच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांचा समावेश होता. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com