जुई जाधव :
Mumbai News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) चिडले तर काय होते, हे सर्वांना ठावूक आहे. अनेकदा राज ठाकरे त्यांच्या पक्षातील नेत्यांना सूचना देत असतात, काही राजकीय कानमंत्र देतात. पण त्यांचे पालन झाले नाही तर ते तोंडसुख घ्यायला कमी करत नाहीत. पण यावेळी राज ठाकरेंनी थेट कारवाई केली आहे.
झाले असे की, पदवीधर निवडणुकीसाठी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे वारंवार बैठका घेत आहेत. कार्यकर्त्यांनी काय करायचे, कोणत्या चुका टाळायच्या याचा ते वारंवार कानमंत्र देत आहेत. पण त्यांचा सल्ला आणि सूचना काही पदाधिकाऱ्यांनी डावलल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या राज ठाकरेंनी थेट कारवाईचा बडगा उगारला.
पदवीधर निवडणुकीसाठी नोंदणी करावी लागते. हे काम मिशन म्हणून करावे लागते. या नोंदणीवरच विजयाची मोहर उमटते. त्यामुळे पदवीधर नोंदणीचे काम खूप गांभीर्यीने आणि सातत्याने करावे लागते. यासाठी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांनी काही मोलाच्या सूचना केल्या होत्या. पण या सूचनांचे अपेक्षित पालन झाले नाही. त्यामुळे पदवीधर निवडणुकीसाठी अपेक्षित नोंदणी झाली नाही. त्यामुळे चिडलेल्या राज ठाकरेंनी विभाग अध्यक्ष आणि शाखाध्यक्ष यांची उचलबांगडी केली आहे.
मनसेचे भायखळा, कुलाबा, मुंबादेवी येथील विभाग अध्यक्षांनी अपेक्षित रिझल्ट न दिल्याने त्यांना पदावरून काढण्यात आले आहे. वडाळ्यातील तीन शाखाध्यक्षांना देखील पदावरून हटवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आता त्यांच्या जागी नवे पदाधिकारी नियुक्त केले जातील. येणाऱ्या काही दिवसांत मुंबईतील अनेक शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांवरही अशीच कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज ठाकरे यांनी पदवीधर मतदार नोंदणीसंदर्भात दादरमधील वीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात काही दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी सर्व पदाधिकारी आणि शाखाध्यक्षांना मार्गदर्शन केले होते. त्यावेळी पदवीधर नोंदणी किती महत्त्वाची आहे, याची जाणीवदेखील करून दिली होती.
त्यानंतर काही पदाधिकारी या कामात कम पडल्याने राज ठाकरेंनी त्यांच्यावर वरील कडक कारवाई केली आहे. या कारवाईनंतर इतर पदाधिकारी जोमाने कामाला लागतील, अशी अपेक्षा आहे. येणाऱ्या निवडणुकींसाठी राज ठाकरे सक्रिय झाल्यामुळे आता कार्यकर्तेही जोमाने कामाला लागले आहेत.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.