Malanggad News : मलंगगडच्या रिंगणाला वादाची किनार; आव्हाडांच्या मुख्यमंत्र्यांवरील ट्विटला म्हस्केंचं प्रत्युत्तर!

Naresh Mhaske Vs Jitendra Awhad : आमदार आव्हाडांना उत्तर देताना नरेश म्हस्केंकडून आव्हाडांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे.
Naresh Mhaske Vs Jitendra Awhad
Naresh Mhaske Vs Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

पंकज रोडेकर -

Thane News : मलंगगडावर पार पडलेल्या रिंगणाला आता वादाची किनार लागल्याचे दिसत आहे. मलंगगडावर केलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाडांनी बुधवारी सकाळी ट्वीट करत टोला लगावला.

आव्हाडांनी 'आता आपण फक्त एकनाथ शिंदे(Eknath Shinde) नाहीत, तर आता आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहात.' असे नमूद करत, 'दोन्ही समाजात शांतता, सामंजस्य भंग आणि धर्माधर्मांत तेढ निर्माण होऊन आपल्या हातून वातावरण बिघडेल. असे कृत्य घडू नये; हे अर्थात, आपला तसा स्वभावही नाही. पण, आपण असे का वागतात, हे कळत नाही.' असेही म्हटले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Naresh Mhaske Vs Jitendra Awhad
Kalyan Malanggad : मलंगगडाच्या पायथ्याशी हिंदुत्वाचा जागर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून आव्हाडांनी केलेल्या ट्विटला शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर देत, आव्हाडांचा एकेरी उल्लेख केला. म्हस्के यांनी आव्हाडांना 'तू बस बोटं मोडत, तुला तेवढंच काम आहे आमच्या प्रत्येक कृतीत आणि विचारात राम आहे!' असे म्हणून वादाला एकप्रकारे तोंड फोडल्याचे दिसत आहे.

जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट नेमकं काय? -

जितेंद्र आव्हाडांनी(Jitendra Awhad ) ट्विटमध्ये म्हटले की, 'मुख्यमंत्री, आपण आपल्या भाषणात काय उद्देशाने बोलता; आपण मनात काय ठेवून भाष्य करता, आपल्या वक्तव्यांमध्ये स्पष्टता नाही.' असे नमूद केले.

शिवाय, 'अनेक वर्षे जिथे हिंदू- मुस्लीम सामंजस्याने रहात आहेत. त्या सामंजस्याला नख लागू नये, अशी आपली इच्छा असेल, असे मला वाटते. पण, जे केले जातेय, ते समजण्यापलिकडे आहे. आपण आता फक्त एकनाथ शिंदे नाहीत तर आता आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहात. दोन्ही समाजात शांतता, सामंजस्य भंग आणि धर्माधर्मांत तेढ निर्माण होऊन आपल्या हातून वातावरण बिघडेल, असे कृत्य घडू नये. अर्थात आपला तसा स्वभावही नाही. पण, आपण असे का वागतात, हे कळत नाही.' असेही आव्हाडांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

Naresh Mhaske Vs Jitendra Awhad
Drivers Strike : चालकांच्या संपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची केंद्र सरकारशी चर्चा

नरेश म्हस्के यांनी दिले प्रत्युत्तर -

आव्हाडांच्या या ट्विटवर काही तासांनी नरेश म्हस्के(Naresh Mhaske) यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी थेट एकेरी शब्दांत उल्लेख करत म्हटले की, 'काय चुकीचं बोलले रे मुख्यमंत्री शिंदे? जे ज्याचे त्याला परत, हा साधा हिशेब. जितेंद्र आव्हाड तुला कळणार नाही, त्यांची तळमळ, आम्हाला माहीत आहे तुझी आगळी मळमळ. पिढ्यानपिढ्या खपल्या आहेत, हक्कासाठी लढा देऊन मुख्यमंत्री शिंदे हेच न्याय देतील मलंगमुक्ती करून. तुला समजणार नाहीच ते तुझं सगळंच बाटलंय, आमच्या हृदयात मात्र अतिक्रमण साठलंय.'

तसेच, 'श्रीमलंग मुक्तीचा स्व. आनंद दिघे यांनी दिला नारा, शिंदेच देतील आता पेटल्या आंदोलनाला थारा, तू बस बोटं मोडत तुला तेवढंच काम आहे. आमच्या प्रत्येक कृतीत आणि विचारात राम आहे.' असे नमूद करत उत्तर दिले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com