Ram Controversy : आव्हाडांवर टीकेचे बाण; रामावरील वक्तव्यानंतर तक्रारींचा पाऊस

Ram Kadam against Jitendra Awhad : भाजप आमदार राम कदम यांची घाटकोपर पोलिस ठाण्यात तक्रार
JItendra Awhad, Ram Kadam
JItendra Awhad, Ram KadamSarkarnama

Mumbai News : भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी श्री रामाबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात ही तक्रार आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी श्री रामाबद्दल केलेल्या वक्तव्याचे (Ram Controversy) कालपासून पडसाद उमटत आहेत. भाजपसह (BJP) हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याअसून ठिकठिकाणी आंदोलन आणि पोलीस ठाण्यांमध्ये आव्हाडांविरोधात तक्रारी करण्यात येत आहेत.

JItendra Awhad, Ram Kadam
Anand Paranjape News : आव्हाडांवर गुन्हा दाखल करा, नाहीतर पोलिस ठाण्यावर रामाची आरती; परांजपेंचा इशारा...

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) कालपासून (३ जानेवारी) दोन दिवसांचे शिबीर शिर्डीत सुरू झाले आहे. यात जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री राम मांसाहार करत होते, असे वक्तव्य केले होते. श्री राम 14 वर्षे वनवासात होते, ते शिकार करत, त्यामुळे ते मांसाहार करायचे, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यानंतर लागलीच नव्या वादाला तोंड फुटले होते.

अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे देशात सध्या अयोध्या हा एकच विषय चर्चेत असताना जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेचे होऊ घातलेली निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद भविष्यातही उमटू शकतील, असे सांगितले जाते. असे असले जितेंद्र आव्हाड त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यामुळे आव्हाडांविरोधातील आंदोलन राज्यासह देशभरात पेटू शकते.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. शरद पवार आज मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे आव्हाडांच्या वक्तव्यावर आज शरद पवार कोणती भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Avinash Chandane)

JItendra Awhad, Ram Kadam
Nashik Political News : राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याविरोधात हिंदुत्ववादी आक्रमक..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com