Mumbai : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना दिले आहे. या निर्णयाविरोधात शरद पवार गट आक्रमक झाला असून सुप्रीम कोर्टात जाणार आहे. विरोधीपक्षातील नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या या निकालावर टीका केली आहे. भाजपने दिलेला निकाल निवडणूक आयोगाने वाचून दाखवला, असे काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले आहेत. तर, हा निकाल अनपेक्षित नाही. शिवेसनेबाबत जे झाले तेच राष्ट्रवादी सोबत होतंय. शेवटी जनेच्या न्यायालयात जावे लागेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मनसेने देखील अजित पवार यांना टार्गेट केले आहे. (Raj Thackeray On NCP)
'बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करण्यासाठी संघर्ष आणि संयम लागतो. हिंमत लागते...' असा थेट हल्ला मनसेच्या ट्विटर हँडलवरून अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव न घेता करण्यात आला आहे.
शिवेसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्वतंत्र राजकारण सुरू केले. आपला पक्ष उभा केला. चिन्ह मिळवले. याचवरून 'स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी 'राज ठाकरे' यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते... असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ !' असे देखील ट्विट म्हटले आहे.
मनसेकडून अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या निकालाचे स्वागत करण्यात आले आहे. भावनिक राजकारणापेक्षा विकासाला महत्त्व आहे. आयोगाने हा निकाल मेरिटवर दिला आहे. आगामी लोकसभेमध्ये महायुतीला 45 प्लस जागा जिंकेल, असा विश्वास देखील शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.