Sharad Pawar New Party : नवा पक्ष, नवं चिन्हं; निकालानंतर शरद पवारांची मोठी मोहीम

Election Commission Of India : जयंत पाटील, सुप्रीया सुळेंनी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे केले स्पष्ट
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांना पक्षावर दावा ठोकला होता. त्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला. आता आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिले. या निकालानंतर शरद पवार गटात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी पक्षाचे नाव सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. तसेच नवा पक्ष आणि नवे चिन्हं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी मोहिमही हाती घेण्यात आल्याचे शरद पवार गटाकडून जाहीर केले आले.

Sharad Pawar
NCP Election Commission: ...निवडणूक आयोग तर राजकारणात उतरला नाही ना?

विधीमंडळातील बहुमत लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना (Ajit Pawar) दिले आहे. यावेळीच आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी पवार यांना त्यांच्या नवीन राजकीय पक्षाची निर्मिती करण्यासाठी आवधी दिला आहे. शरद पवार गटाने आपला पक्ष आणि चिन्ह ठरवण्यासाठी 7 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत तीन नावे सादर करण्यास सांगितले.

Sharad Pawar
Rohit Pawar On NCP Crisis : केंद्रातील महाशक्तीने पक्ष बळकावला; रोहित पवार भडकले

निकालानंतर जयंत पाटलांनी आमचा पक्ष आणि चिन्ह फक्त शरदचंद्र गोविंदराव पवार असल्याचे सांगितले. त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या फोटो आणि त्याखाली शरदचंद्र गोविंदराव पवार असे नमूद केलेला फोटो पोस्ट केला आहे. तसेच आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाने चार नावे आणि चिन्हे ठरवल्याची माहिती आहे. त्यात उगवता सूर्य आणि चष्मा या दोन चिन्हांचा समावेश असल्याची माहिती 'साम' वृत्तवाहिनाच्या हाती लागली आहे.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रीया सुळे यांनी सांगितल्यानुसार शरद पवार गटाचे पदाधिकारी सोशल मीडियावर आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar NCP Crisis : निवडणूक आयोगाचा निर्णय; शरद पवार उचलणार मोठं पाऊल, दिल्लीत हालचाली

निवडणूक आयोगाचा निकाल येताच पुढील रणनीती आखण्यासाठी शरद पवार गटाने हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. निकाल विरोधात गेल्याने दिल्लीत शरद पवार गटाच्या वकिलांची बैठकी पार पडली. या बैठकीत पक्षांच्या नेत्यांनी जाहीर केल्यानुसार उद्या सकाळी शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तत्पुर्वी निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीत शरद पवार गटास आपल्या नव्या पक्षाची तीन नावे आणि चिन्हे सादर करावी लागणार आहे. त्यासाठी चार नावे आणि चिन्हे तयार आहेत. त्यात उगवता सूर्य आणि चष्मा या चिन्हांचा समावेश आहे. आता आयोगात कोणते नाव आणि चिन्हं शरद पवारांच्या नव्या पक्षासाठी अंतिम होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar
Ajit Pawar On NCP : '...तर आम्हीही सुप्रीम कोर्टात गेलो असतो!'; आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवारांचं मोठं विधान!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com