Raj Thackeray _ Raigad Shivaji Maharaj 
मुंबई

MNS Vardhapan Din: रायगडाच्या साक्षीने मनसेची नवी दिशा? वर्धापन दिनासाठी राज ठाकरेंची खास रणनीती; काय करणार घोषणा?

MNS Vardhapan Din: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा येत्या ९ मार्च रोजी १९ वा वर्धापन दिन साजरा होत असून हा पक्ष २० व्या वर्षात पदार्पण करणार आहे.

Amit Ujagare

MNS Vardhapan Din: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन ९ मार्च रोजी साजरा होणार आहे. पण यंदाचा वर्धापनदिन हा मनसैनिकांसाठी खास असणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या पायथ्याशी हा सोहळा सेलिब्रेट केला जाणार आहे. यासाठी खास योजना पक्ष प्रमुख राज ठाकरेंनी आखल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

कसा असेल कार्यक्रम?

9 मार्च रोजी सकाळी रायगड किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला राज ठाकरे अभिवादन करतील. त्यानंतर मनसेच्या वर्धापनदिनाचा सोहळा आणि भाषणांचा कार्यक्रम किल्ल्याच्या पायथ्याशी होणार आहे. यावेळी मनसेच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी १०० टक्के हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळं यंदाचा वर्धापनदिन हा मनसेसाठी कार्यकर्त्यांसाठी तसंच खुद्द राज ठाकरेंसाठी खास असणार असल्याचं दिसून येतंय.

राज ठाकरेंच्या घोषणेकडं लक्ष

दरम्यान, यावेळी राज ठाकरे काही महत्वाच्या घोषणा करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत समाधानकारक कामगिरी करता आली नसल्यानं राज ठाकरे नाराज आहेत. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी जुळवून घेत ठाकरे बंधु एकत्र आल्याचं मात्र समाधान आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं पार पडणार असलेल्या या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात काहीतरी मोठी घोषणा नक्कीच केली जाऊ शकते, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT