

International Women's Day : शहरातील महिलांच्या अनेक समस्या प्रदीर्घकाळ रेंगाळले आहेत. या संदर्भात विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांचा हस्तक्षेप यशस्वी ठरला आहे. त्यामुळे महिलांचा एक गंभीर विषय निकाली निघाला आहे. नाशिकच्या बस स्थानकाच्या सुलभ शौचालयात गेली अनेक वर्ष महिलांकडून पैसे वसुली केली जात होती. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्यांनी केलेले प्रयत्नही अयशस्वी झाले होते. कर्मचाऱ्यांच्या अरेरावी पुढे सगळेच हतबल असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कृष्णा चांदगुडे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी हा विषय हाती घेतला होता. परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्या नुकत्याच झालेल्या नाशिक दौऱ्यात हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. बस स्थानकातील महिलांचे कुचंबणा समजल्यावर सभापती गोऱ्हे यादेखील आश्चर्यचकित झाल्या. यासंदर्भात राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी थेट सूचना केल्या. अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली होती की, संबंधित सुलक्ष शौचालयाच्या संचालकांकडून अरेरावी केली जाते, अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन त्या संचालकापुढं हतबल असल्याचे चित्र होतं.
सुलभ शौचालयाच्या दादागिरीमुळं आणि विशिष्ट धमक्या दिल्या जात असल्याने अनेक कार्यकर्ते आणि अधिकारी त्यापासून दूरच राहत होते. हा प्रश्न न्यायालयापर्यंत देखील गेला होता. पूर्वीही भाजपच्या महिला नेत्यांनी लेखी पत्र दिले होते. आंदोलन झाले होते, मात्र तरीही महिलांचा हा प्रश्न सुटू शकला नव्हता. पण आता सभापती गोऱ्हे यांनी बस स्थानकाच्या शौचालयात महिला कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिले. त्यांना शौचालयाचा वापर मोफत असताना त्यांच्याकडून वसुली होत असल्याने नियमांचे काटेकोर पालन होईल याकडं लक्ष देण्याच्या सुचना पोलिसांनी दिल्या आहेत.
शहरातील तीन महिला आमदार सत्ताधारी पक्षाच्या आहेत. या महिला आमदारांकडेही अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, हा प्रश्न सुटत नव्हता. पण यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेऊन योग्य व्यक्तीपर्यंत अर्थात सभापती गोऱ्हेंपर्यंत हा विषय घेऊन गेल्यानं तो आता सुटला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.