A new mother from Mokhada walks 2 km through the forest carrying her newborn after the ambulance left her midway. This shocking healthcare negligence exposes the rural medical crisis Sarkarnama
मुंबई

Palghar News : संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्या रस्त्यात सोडलं; अवघ्या 2 दिवसांच्या बाळाला घेऊन मातेची जंगलातून पायपीट

Mokhada Pregnant Woman Incident : मोखाडा तालुक्यातील आमला गावाचे माहेर असलेल्या सविता बांबरे या महिलेला 19 नोव्हेंबर ला प्रसूतसाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सुखरूप प्रसूतीसाठी त्यांना जव्हारच्या ऊपजिल्हा रुग्णालयात पाठवलं. तिथे त्यांची प्रसूती सुखरूप झाली.

Jagdish Patil

Palghar news, 25 Nov : राज्य सरकार गर्भवती महिला बालसंगोपनाच्या कितीही योजना राबवत असलं तरी राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या असंवेदनशील कारभार अनेकदा समोर येतो. याचंचं आणखी एक पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातील ताज आणि संतापजनक उदाहरण समोर आलं आहे.

मोखाडा तालुक्यात एका प्रसूत महिलेला रुग्णवाहिका चालक गावाच्या दोन किलोमीटर मागेच अर्ध्या रस्त्यात सोडून गेल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. रुग्णवाहिका चालकाच्या या मुजोरपणामुळे या प्रसूत महिलेला अवघ्या दोन दिवसाच्या बाळाला हातात घेऊन घनदाट जंगलातून दोन किलोमीटर पायपीट करावी लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोखाडा तालुक्यातील आमला गावाचे माहेर असलेल्या सविता बांबरे या महिलेला 19 नोव्हेंबर ला प्रसूतसाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सुखरूप प्रसूतीसाठी त्यांना जव्हारच्या ऊपजिल्हा रुग्णालयात पाठवलं. तिथे त्यांची प्रसूती सुखरूप झाली.

त्यानंतर रविवार 23 नोव्हेंबरला त्यांना रुग्णवाहिका देऊन घरी पाठविण्यात आलं. मात्र, रुग्णवाहिका चालकाने त्यांना गावापासून दोन किलोमीटर लांब रस्त्यावर उतरवलं आणि तो निघून गेला. त्यामुळे सविता यांना ताणसा अभयारण्यातील आमला गावात पोहोचण्यासाठी दोन किलोमीटर चालत जावं लागलं.

अवघ्या दोन दिवसांच्या बाळाला घेऊन प्रसूत सविता बारात त्यांच्या आई आणि सासूबाईसोबत चालत जात असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, आरोग्य यंत्रणेचा गचाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यानंतर आरोग्य यंत्रणेवर चहूबाजूंनी टीका केली जात आहे.

हा व्हायरल व्हिडीओ आमल्यातील राजु सोमा बारात या नागरिकाने सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे ही घटना उघडकीस आली. त्यानंतर मोखाडामध्ये एकच खळबळ ऊडाली असून आदिवासी माणसांनी असेच जगायचे आणि मरायचे का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

दरम्यान, सविता बांबरे यांनी जव्हारहुन केवनाळे येथे जाण्यासाठी 102 क्रमांकाची रूग्णवाहीका बुक केली होती. मात्र, त्यांनी सुर्यमाळ येथे आल्यानंतर आमले येथे जाण्याचा चालकाकडे आग्रह धरला. मात्र, चालकाने त्यांना आमला गावाच्या फाट्याजवळ नेले, त्यानंतर चालकाला आम्ही येथुन पायी घरी जाऊ, असं सांगितल्याचं रूग्णवाहीका चालकाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण दिलं आहे. याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भाऊसाहेब चत्तर यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT