Dharmendra .jpg
Dharmendra .jpgSarkarnama

Dharmendra News: धर्मेंद्र यांनी भाजपच्या तिकीटावर जिंकलेली 'खासदारकी'; काँग्रेसच्या ताकदवान नेत्यालाच दिला होता पराभवाचा धक्का

Dharmendra Political News: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. मोठी कारकीर्द राहिलेल्या या अभिनेत्याच्या निधनानंतर सिनेजगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पण त्यांनी अभिनयाबरोबरच राजकारणातही करिष्मा दाखवताना खासदारकी खेचून आणत एक काळ गाजवला होता.
Published on

Mumbai News: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांना काही दिवसांपूर्वीच मुंबईतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. मात्र,सोमवारी(ता.24) सकाळी साडेनऊच्या दरम्यान अभिनेते धर्मेंद यांनी अखेरचा श्वास घेतला.पण अभिनयाबरोबरच त्यांनी राजकारणातही खासदारकी खेचून आणत एक काळ गाजवला होता.

अभिनेते धर्मेंद्र उर्फ केवल कृष्ण देओल यांनी 2004 रोजी राजस्थान येथील बिकानेर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) तिकीटावर खासदारकी जिंकली होती. धर्मेंद्र यांनी काँग्रेसचे तगडे नेते रामेश्वरलाल दुडी यांचा तब्बल 60000 पेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता.

पण धर्मेंद यांनी आपली पाच वर्षांची खासदारकीची एक टर्म पूर्ण केल्यानंतर राजकारणाला रामराम ठोकला. खासदारकी मिळवल्यानंतरही ते क्वचितच कधी संसदेत दिसून आले. मात्र,आपली बॉलिवूडमधील लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी बिकानेर सारख्या मतदारसंघातून काँग्रेसच्या (Congress) मातब्बर नेत्याला धूळ चारत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

एकीकडे पत्नी हेमा मालिनी यांनी अभिनयासोबतच राजकारणात आपला जम बसवला असतानाच धर्मेंद हे मात्र राजकीय क्षेत्रात जास्त काळ रमलेच नाहीत. 2004 ची निवडणूक जिंकलेल्या धर्मेंद यांची भाजपकडून पुन्हा 2009 च्या निवडणुकीसाठी प्रचंड मनधरणी करण्यात आली. पण ते राजकारणातून माघार घेण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिले. बॉलिवूडचा 'ही-मॅन' तेव्हापासून ते आजतागायत राजकारणापासून काहीसा अलिप्तच राहिला.

Dharmendra .jpg
Bihar Election: बिहारमधील दारुण पराभव जिव्हारी; काँग्रेसची सर्वात मोठी कारवाई, एकाचवेळी 7 जणांची हकालपट्टी

पण धर्मेंद यांनी एका कार्यक्रमात राजकारणावर अगदी परखड मत व्यक्त केले होते. त्यांनी राजकारणात येणे ही चूक होती असं मी म्हणणार नाही, मात्र, एखाद्या अभिनेत्याने राजकारणात येऊ नये. अभिनेत्याने नेहमी अभिनेताच राहावं,असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं. तसेच मला कधीच राजकारण ही गोष्ट करायची नव्हती, असं प्रामाणिकपणं नमूद केलं होतं.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. मोठी कारकिर्द राहिलेल्या या अभिनेत्याच्या निधनानंतर सिनेजगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे. विलेपार्लेच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्मेंद यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेतेमंडळी, बॉलिवूड अभिनेत्यांनी श्रध्दांजली वाहिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com