NCP News Sarkarnama
मुंबई

Maharashtra Monsoon Session: राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांची अधिवेशनाच्या कामकाजास टाळाटाळ; अद्यापही संभ्रम?

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये अद्यापही संभ्रम

महेश जगताप

Mumbai News: राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाजात थेट सहभाग घेण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीत बंड करत उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सामील झाले. मात्र, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले.

त्यानंतर काही आमदारांनी आपला पाठिंबा अजितदादांना दिला, तर काही आमदार शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे राहिले. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नऊ मंत्री सोडले तर इतर सर्व आमदारांपैकी बहुतांश आमदारांनी अधिवेशानाच्या कामात थेट सहभाग घेण्याचे टाळले आहे.

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे 80 टक्के आमदार विधानभवनात फक्त हजेरीसाठी येत असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही पवार गटाची स्पष्ट भूमिका नसल्याने दोन्ही गटातील आमदार द्विधा मनस्थितीत असल्याचे बोलले जात असून त्यामुळे ते कामकाजामध्ये सहभागी होण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत अजित पवारांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला जवळपास 35 पेक्षा जास्त आमदारांनी पाठींबा दिल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. पण या सर्व आमदारांचे शरद पवारांवरही तितकेच प्रेम असल्याचे ते बोलूनही दाखवतात. तर हीच बाब अजित पवार यांच्या बाबतही लागू होते.

या आमदारांना आपल्या मतदासंघासाठी निधी मिळवायचा असेल तर अजित पवारांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कोणत्या गटाला पाठींबा द्यायचा यावरून आमदारांमध्ये मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे आमदार अधिवेशनात थेट पणे सहभागी होण्याचे टाळत असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या आमदारांमध्ये अद्यापही संभ्रम?

राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या दोन्ही गटाचे बहुतांश आमदार सकाळी दहाच्या दरम्यान विधानभवनात येऊन हजेरी लावतात. त्यानंतर सभागृहाच्या बाहेर मंत्र्याच्या दालनात मतदासंघांतील कामांचा पाठपुरावा करण्याकरिता वेळ घालवतात.

तर कही आमदार मंत्रालयात आपला मोर्चा वळवतात. मात्र, राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत तर दुसरा गट विरोधी पक्षात असल्याने आपण कोणत्या बाजूला बसायचं हा संभ्रम आमदारांसमोर असल्याने बहुतांश आमदार सभागृहात बसण्याचे टाळत असल्याची माहिती सुंत्राकडून कळते आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT