NCP Jayant Patil News: जयंत पाटील खरोखरच अजित पवारांकडे जाणार का?; शिरसाटांच्या भाकिताने खळबळ

Will Jayant Patil Join Ajit Pawar Group: राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण
Ajit Pawar and Jayant Patil:
Ajit Pawar and Jayant Patil: Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी आपली ताकद पक्षाध्यक्ष शरद पवारांसोबत ठेवली आणि फुटीर गटाला त्यातही उपमुख्यमंत्री अजित पवारांसारख्या नेत्यांना आव्हान दिले. अजितदादांकडील नेत्यांनी पाटलांना लक्ष्य करीत 'बडवे' केले. त्यानंतर बहुतांश नेते जयंत पाटलांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले. त्यामुळे अजितदादा आणि पाटलांमध्ये दरी वाढत गेल्याचे चित्र आहे. मात्र, निधी वाटपात पाटलांना प्रचंड निधी मिळाल्याचे आकडे मांडले जातात.

या निधीचा संबंध जोडून शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाटांनी पाटील हे अजितदादांकडे येणार असल्याचा खळबळजनक दावा केला. त्याच वेळी मला मिळालेल्या निधीची अफवा असल्याचे पाटलांनी माध्यमांपुढेच सांगितले. मात्र, पाटलांना दिलेल्या निधीचा आकडा खरा आहे का, तसे असल्यास पाटील शरद पवारांची साथ सोडणार का, याची चर्चा होऊ शकते.

Ajit Pawar and Jayant Patil:
Narwekar Offer To Balasaheb Patil : विधानसभा अध्यक्षांची शरद पवार गटातील बाळासाहेब पाटलांना मंत्रिपदाची ऑफर!

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. यानंतर दोन्ही गटाने एकमेकांविरूद्ध जोरदार आरोप-प्रत्यारोप केल्याने राष्ट्रवादीविरोधात राष्ट्रवादीच असे चित्र तयार झाले होते.

अजित पवारांच्या गटाकडून मंत्री छगन भुजबळ तर शरद पवारांच्या गटाकडून जयंत पाटील हे आपली बाजू मांडत होते. मात्र, अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांसह शरद पवारांची सलग दोनदा भेट घेतल्यानंतर दोन्ही गटातील संघर्षाची धार काहीसी कमी झाल्याची चर्चा आहे.

Ajit Pawar and Jayant Patil:
Assembly Monsoon Session : कर्जमाफीतून शेतकरी सातबारा कोरा करा : शशिकांत शिंदेंचा अधिवेशनात आवाज

सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या समर्थक आमदारांना जास्त निधी दिल्याची टीका होत आहे. त्यातच गेल्या काही दिवासांपासून अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा आहेत. पण या चर्चा फेटाळून लावत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. यानंतर आता आमदार शिरसाटांनी केलेल्या भाकिताने पुन्हा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com