Milind Deora, Aditya Thackeray  Sarakarnama
मुंबई

Milind Deora News: 'ट्विटरवरचे नको, जमिनीवरचे आमदार हवेत'; शिंदे गटाचे देवरा आदित्य ठाकरेंना नेमकं काय म्हणाले ?

Shivsena Political News : दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत अरविंद सावंत यांना वरळी मतदारसंघातून फक्त 6 हजाराच लीड मिळाले असल्याची टीका खासदार मिलींद देवरा यांनी केली.

Sachin Waghmare

Mumbai News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाचा झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. या मतदार संघातील कामावरून शिंदे गटाकडून नेहमीच ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलींद देवरा यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघात मुळ मराठी समाज राहतो. मी शनिवारी वरळी मतदारसंघात भेट देऊन आलो. तिथल्या नागरिकांनी सांगितल की, आम्हाला ट्विटर आमदार नको, जमिनीवरचे आमदार हवेत. दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत अरविंद सावंत (Arvind Sawant) यांना वरळी मतदारसंघातून फक्त 6 हजाराच लीड मिळाले असल्याची टीका यावेळी खासदार मिलींद देवरा (Milind Deora) यांनी केली. (Milind Deora News)

लाडकी बहीण योजनेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. बहिणीसाठी ज्यांनी काहीच केल नाही ते यावर बोलत आहेत. मुख्यमंत्री ग्रामीण भागातील महिलांचे हात बळकट करण्यासाठी योजना लागू केली होती. मात्र, काही लोक कोर्टात गेले पण कोर्टाने त्यांना चपराक दिली असल्याचे देवरा म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत जनता यावेळी खऱ्या शिवसेनेला मान्यता देईल. अरविंद सावंत 10 वर्ष खासदार आहेत, ते कोणाच्या मतांवर जिंकले हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांनी चाळीत राहणाऱ्या किती लोकांना घर दिली ? माझे वडील, मी खासदार असताना अनेक लोकांना घर दिली असल्याचे देवरा यांनी सांगितले.

गेली दहा वर्ष झाली अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे या भागाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनी या भागात राहणाऱ्या मुळ रहिवाशांसाठी काय केले ? त्यांना कॊणत्या सोयीसुविधा पुरवल्या आहेत, त्याचे उत्तर खासदार सावंत यांनी द्यावे, असे आवाहन खासदार मिलिंद देवरा यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT