Nilesh Lanke  Sarkarnama
मुंबई

Video Nilesh Lanke News : अजित पवारांची भेट झाली का? खासदार नीलेश लंके शरद पवारांच्या भेटीला रवाना...

Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके बुधवारी विधान भवनात आले होते. विधानभवनात येताच ते पायऱ्यांवर नतमस्तक झाले. अजित पवार हे व्यस्ततेमुळे भेटले नसले, तरी ते शरद पवार यांच्या भेटीला रवाना झाले.

Pradeep Pendhare

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्याकडे आलेले नीलेश लंके आता खासदार झाले आहेत. खासदार झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आज विधानभवनात आले. विधान भवनात येताच त्यांनी नतमस्तक होत दर्शन.

यानंतर त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भेटीवर भाष्य केले. "विधान भवनात काही कामानिमित्त आलो होतो. माझे जुने सहकारी मला भेटले. आनंद वाटला. मात्र अजितदादा त्यांच्या व्यस्ततेमुळे भेट होऊ शकली नाही", अशी प्रतिक्रिया खासदार नीलेश लंके यांनी दिली. खासदार लंके विधानभावनातून बाहेर पडल्यानंतर थेट शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला गेले आहेत. (Nilesh Lanke News)

नीलेश लंके विधान भवन परिसरात येतात त्यांच्याभोवती त्यांच्या चाहत्यांचा गराडा पडला. त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या. बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी देखील त्यांच्याशी नेतृत्वाच्या नात्याने भेटले. काँग्रेसचे (Congress) आमदार रवींद्र धंगेकर आणि खासदार लंकेमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या.

बीडचे खासदार बजरंग सोनवणे देखील विधानभवनात होते. हे सर्व जायंट किलर विधानभवनात एकत्र आल्याने त्यांचीच चर्चा होती. यातच खासदार नीलेश लंके यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले. हा प्रसंग अनेकांनी आपल्या कॅमेरामध्ये टिपला. खासदार लंके नतमस्तक होत असताना विधानमंडळाच्या प्रवेशद्वारावर आमदार जितेंद्र आव्हाड उभे होते. त्यांनीही वरून नमस्कार केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नीलेश लंके यांच्या भोवती आले.

मतदारसंघातील विविध कामासंदर्भात विधानभवनात आलो होतो. त्यावेळी जुने सहकारी भेटले. आनंद वाटला. 2019 मध्ये या विधानभवनात आमदार म्हणून आलो होतो. साडेचार वर्ष सामान्य नागरिकांसाठी अभिमानाने काम केल्याचा आनंद वाटतो. जुन्या सहकारी भेटल्याचे खासदार लंके यांनी सांगितले. अजितदादांची भेट झाली का? यावर खासदार लंके म्हटले, "दादा कामात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही".

दिल्लीत मी इंग्रजीत बोलतो

इंग्रजीच्या मुद्द्यावरून विचारले असता खासदार नीलेश लंके म्हणाले, "राज्यात कामकाज करत असताना इंग्लिश बोलण्याची काही गरज भासली नाही. अभिमानाने मराठी बोललो. विधिमंडळात साडेचार वर्ष कामकाज करत असताना कोणी काही मराठी बोलले नाही. परंतु मराठीचे कौतुकच झाले. आता खासदार झालो आहे. दिल्लीत इंग्रजीत बोलतो आहे. समोरच्याला मराठी कळत नसेल, तर मी त्याच्याशी इंग्रजीत बोलतो, असे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच शेतकऱ्यांचे प्रश्न समजू शकते

विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली. राज्याचा राजकारणाचा ट्रेंड बदललेला आहे. महाविकास आघाडीला सहानुभूतीची लाट आहे. महाविकास आघाडीच राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेऊ शकतात. त्याच्यावर ते काम करून ते सोडवू शकतात, असे नीलेश लंके यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT