Vijay Wadettiwar News : आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल तर सत्तेतून पायउतार व्हा, आम्ही निर्णय घेऊ; वडेट्टीवारांच सरकारला आव्हान

Political News : सरकार म्हणून दोनशे सहा सदस्यांचे बहुमत आहे. निर्णय घेता येत नसेल तर राजीनामा द्यावा. आमच्याकडे सत्ता द्यावी आम्ही मार्ग काढू. मात्र आमच्याकडे बोट दाखवत आपलं अपयश लपवू नये.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

Mumbai News : सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळ बंद पडण्याची आज भूमिका घेतली. ओबीसी मराठा समाजातील वादाला आणि आरक्षणाच्या प्रश्नाला महायुती सरकार कारणीभूत आहे. एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. दोन्ही समाजाच्या वेगवेगळ्या गुप्त बैठका घेतल्या. त्यावेळी आम्हाला विश्वासात घेतले नाही. शिवाय आंदोलकांना लेखी स्वरूपात काय दिलं ते देखील आम्हाला सांगितलं नाही.

शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होत. मुख्यमंत्र्यांनी गुलाल उधळला ते मराठा आणि ओबीसी समाजाच्या भावनांशी खेळले, अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. (Vijay Wadettivar News)

महायुती (Mahayuti) सरकारकडे पाशवी बहुमत आहे. सरकार म्हणून जी भूमिका घेण्यास हवी होती, पाहिजे ते घेत नाहीत. दोन्ही समाजांना मुद्दाम झुलवत ठेवलं आहे. हाके यांचं उपोषण स्थगित करायला गेलेले सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी तिथे प्रक्षोभक वक्तव्य केले. भुजबळ वाद मिटवायला गेलेले की वाढवायला गेले होते, असा सवाल ही वडेट्टीवार यांनी केला.

आरक्षण संदर्भात एक बाजू मुख्यमंत्री आणि दुसरी उपुख्यमंत्र्यांनी सांभाळायचं असं ठरलं आहे. मात्र, आता नाकातोंडात पाणी गेल्यावर. विरोधकांना बोलावत आहेत. निर्णय घ्यायला यांना कोणी रोखल नसतानाही ते आता आम्हाला बोलवत आहेत. त्यांनी काय आश्वासन दिले आहे ते अधिवेशनात मांडा म्हणलं असताना त्यांनी ते मुद्दाम मांडल नसल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

Vijay Wadettiwar
Ashok Chavan : मराठा आरक्षण बैठकीत अशोक चव्हाणांनी जरांगेंच्या भेटीतील मुद्यांवर दिला जोर...

सरकार म्हणून दोनशे सहा सदस्यांचे बहुमत आहे. निर्णय घेता येत नसेल तर राजीनामा द्यावा. आमच्याकडे सत्ता द्यावी आम्ही मार्ग काढू. मात्र, आमच्याकडे बोट दाखवत आपलं अपयश लपवू नये. आमचा आवाज दाबला जातोय. त्या बहुमताचा आधारावर का प्रश्न सोडवत नाही? तुमच्या हाताला लकवा मारायलाय का? अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली.

Vijay Wadettiwar
Video Vijay Wadettiwar: मुख्यमंत्री...,मुख्यमंत्री म्हणून मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका; 200 आमदार निवडून आणा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com