Sanjay Raut-Raj Thackeray
Sanjay Raut-Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut On Raj Thackeray: राज कधीपासून हिंदु्त्ववादी झालेत..; राऊतांचा टोमणा

सरकारनामा ब्युरो

Mumbai News: "माझ्या वाटेला गेल्यामुळे ठाकरे सरकार पडले," असा दावा काल (गुरुवारी) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापनदिनी केला आहे. याला ठाकरे गटातील नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांचा सडेतोड उत्तर दिले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

राऊत म्हणाले, "हे सरकार केवळ ईडी, सीबीआय आणि खोक्याच्या साथीने पडले हे सर्वांना माहिती आहे, राज ठाकरेंना जर हे समजत नसेल तर त्यांच्या पक्षाची व्यवस्थित वाढ होणे गरजेचे आहे," "राज ठाकरेंना ईडी काय हे आम्ही सांगायची गरज नाही, त्यांना चांगला अनुभव आहे," अशा शब्दात राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं.

"मनसेच्या वाटेला जाण्याएवढा तो पक्ष मोठा नाही, महाराष्ट्रात सरकार का पडले हे सर्वांना माहिती, केवळ ईडी, सीबीआयमुळे सरकार पडले हे जर त्यांना समजत नसेल तर त्यांच्या पक्षाचा वाढ व्यवस्थित होणे गरजेचे आहे," असे राऊत म्हणाले.

"शेतकऱ्यांना खते खरेदी करण्यासाठी जात दाखवावी लागतेय, महाराष्ट्र हे पुरोगामी राष्ट्र आहे, केंद्र आणि राज्य सरकारकडून जात आणि धर्म यावर राजकारण सुरू केले आहे. प्रत्येक ठिकाणी राज्यसरकारकडून जात दाखवा म्हणत असेल तर महाराष्ट्रातील जनतेला धर्म काय आहे हे दाखवावा लागेल," असे राऊत म्हणाले.

"आम्ही अनुभव घेऊनही पक्षाचे काम सुरू आहे. आम्ही महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदूत्व हे कधीच सोडले नाही, या विषयावर कधीच आम्ही भूमिका सोडली नाही. राज कधीपासून हिंदु्त्ववादी झालेत? असा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केला.

हे शेवटचे बजेट..

"राज्य सरकारचे हे शेवटचे बजेट असणार आहे. त्यामुळे सरकार कोसळण्याच्या भीतीने हे बजेट सादर केले आहे. यात केवळ घोषणा आहेत, तिजोरीत पैसे नसताना घोषणा करून काय होणार असेही त्यांनी म्हटले आहे. "सुप्रीम कोर्टात 16 आमदार हे अपात्र ठरणार आहेत, त्यामुळे हे सरकार कोळसणार आहे," असे राऊत म्हणाले.

धर्म काय आहे हे दाखवावा लागेल..

शेतकऱ्यांना खते खरेदी करण्यासाठी जात दाखवावी लागतेय, महाराष्ट्र हे पुरोगामी राष्ट्र आहे, केंद्र आणि राज्य सरकारकडून जात आणि धर्म यावर राजकारण सुरू केले आहे. प्रत्येक ठिकाणी राज्य सरकारकडून जात दाखवा म्हणत असेल तर महाराष्ट्रातील जनतेला धर्म काय आहे हे दाखवावा लागेल, असा इशारा राऊतांनी दिला.

आम्ही निर्धार केला..

"कसब्याच्या निकालातून मतदार कुठे गेला हे दिसले, नेत्याचे काय घेऊन बसलात," असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावत राऊत म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवून भाजपला पराभूत करण्याचा आम्ही निर्धार केला आहे. मविआच्या बैठकीत आम्ही चिंचवडला आमच्यात झालेल्या बंडखोरीमुळे निसटता विजय मिळाला, असा टोलाही त्यांनी बावनकुळे यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT