Sanjay Raut , Eknath Shinde
Sanjay Raut , Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : शिंदे-फडणवीस सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून ? ; दोघेही उघडपणे अनैतिक पद्धतीने एकत्र राहताहेत..

सरकारनामा ब्युरो

Sanjay Raut on Sheetal Mhatre Controversy CM Eknath Shinde : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केलं आहे. शिवसेना नेत्याचा व्हिडिओ व्हायरल, ईडी, सीबीआयची चौकशी यावरुन राऊतांनी 'सामना'तील आपल्या 'रोखठोक'सदरातून शिंदे-फडणवीस सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

महाराष्ट्रात एका जाहीर चुंबनाचे प्रकरण सध्या सगळ्यांचेच मनोरंजन करीत आहे. शिंदे गटाच्या एका आमदाराने त्यांच्याच महिला पदाधिकाऱ्याचे जाहीर चुंबन घेतले. चुंबन घेणे हा गुन्हा आहे काय यावर निर्णय व्हायला हवा. चुंबन हा गुन्हा नसेल तर मग शिवसैनिकांना अटक करण्याचे कारण काय? महाराष्ट्रातील सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून झाले? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

यास काय म्हणावे?

चुंबन घेणे हा गुन्हा आहे का, एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांनी फडणवीस यांच्याबरोबर सरळ ‘लव्ह जिहाद’चाच प्रकार केला व उघडपणे अनैतिक पद्धतीने एकत्र राहत आहेत, यास काय म्हणावे? असा थेट सवाल संजय राऊत यांनी आजच्या सामनातून विचारला आहे.

लुटमारीची तक्रार

विरोधक लढण्याच्या मूडमध्ये आहेतच, पण विरोधकांत अद्यापि एकीचे दर्शन होत नाही. हेच श्री. मोदी व शहांचे बलस्थान आहे. ‘ईडी’सारख्या संस्था कायद्याचा गैरवापर करून विरोधकांना जेरीस आणतात. त्याविरुद्ध सर्व विरोधी खासदारांनी एकत्र येऊन ‘ईडी’ कार्यालयावर मोर्चा काढावा. गौतम अदानी यांनी केलेल्या लुटमारीची तक्रार ‘ईडी’ संचालकांकडे करावी असे ठरले; पण त्या तक्रारीवर ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस व महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसने सह्या केल्या नाहीत. ‘ईडी’वरील मोर्चातही हे पक्ष सामील झाले नाहीत, असे राऊतांनी म्हटलं आहे.

'रोखठोक'मध्ये राऊत म्हणतात..

  • गौतम अदानीच्या विरोधात वातावरण तापले आहे. त्यावर पाणी टाकण्यासाठी विरोधकांच्या घरांवर धाडी व अटका सुरू आहेत.

  • सगळाच ‘नाटू नाटू’चा प्रकार असल्याची टीका आजच्या सामनाच्या रोखठोक या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

  • देशात भीतीचे वातावरण आहे. माणसाचे शोषण हे भीतीच्या माध्यमातून केले जाते. आज गुडघे टेकण्याची स्पर्धा त्याच भयातून सुरू आहे.

  • भारतीय जनता पक्षात सामील व्हा, गप्प बसा, नाहीतर तुरुंगात जा, असे सध्या सुरू आहे.

  • एकनाथ शिंदे व त्यांच्या चाळीस लोकांवर अशीच भीतीची तलवार टेकवली व त्यांना शरण आणले हे आता लपून राहिलेले नाही.

  • महाराष्ट्रात ‘चुंबना’वर चर्चा सुरू आहे. शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. देशात ईडी, सीबीआयने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT