Sanjay Raut, Kirit Somaiya sarkarnama
मुंबई

बाप बेटे जेलमध्ये जाणार ; राऊतांचे सूचक टि्वट

राऊतांनी प्रामुख्याने भाजपचे नेते किरिट सोमय्या आणि त्याचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला. राऊतांनी आज टि्वट करुन पुन्हा सोमय्यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप आणि भाजप नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांनी प्रामुख्याने भाजपचे नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्याचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला. राऊतांनी आज टि्वट करुन पुन्हा सोमय्यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

''निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कोणाची आहे ? ही सोमय्यांची कंपनी आहे. PMC घोटाळ्यातील आरोपी वाधवान याला ब्लॅकमेल करून सोमय्यांनी 80 ते 100 कोटी रुपयांची रोकड घेतली. निकॉन कन्स्ट्रक्शनमार्फत दोन ठिकाणी जमीन घेतली. या कंपनीचे सर्व प्रकल्प रद्द करा, असे माझे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आवाहन आहे. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना तातडीने अटक करा,'' अशी मागणी राऊतांनी मंगळवारी केली.

''बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch!कोठडीचे sanitization सुरू आहे..जय महाराष्ट्र!,''असे टि्वट राऊतांनी केले आहेत.

राकेश वाधवान यांच्यापासून 12 हजार कोटी रुपयाची जमीन मोहित कंबोजने 100 कोटी रुपयांत खरेदी केली, याच्यांशी सोमय्या कुटुबीयांशी संबध असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.

मंगळवारी राऊतांनी भाजपवर हल्लाबोल करतांना चौफेर फटकेबाजी केली. ते म्हणाले, फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्रात 25 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. तसेच महाआयटीमध्ये ५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. फडणविसांच्या काळातील ५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब माझ्याकडे आहेत. ते सगळे कागदपत्र घेवून आधी EOW कडे तक्रार करणार आणि नंतर हे प्रकरण ईडीकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल केला. मराठी भाषेच्या विरोधात कोर्टात सोमय्या गेले होते आणि हे यांचे नेता आहे, असे भाजपला सुनावले.

राऊत म्हणाले, PMC बॅंक घोटाळ्यातील पैसे मी वापरत असल्याचा सोमय्या सांगतात. पण त्यातील राकेश वाधवानने वीस कोटी रुपये भाजपच्या अकौंटमध्ये गेले आहेत. निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कोणाची कंपनी आहे? ही सोमय्यांची कंपनी आहे. PMC घोटाळ्यातील आरोपी वाधवान याला ब्लॅकमेल करून सोमय्यांनी ८० ते १०० कोटी रुपयांची रोकड घेतली, असा आरोपही त्यांनी केला. तसेच, माजी वनमंत्री सुधीर मुनगंटिवार यांच्या मुलीच्या लग्नातील सेटची किंमत साडेनऊ कोटी रुपये सांगत राऊतांनी मुनगंटीवार यांनाही डिवचले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT