Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut on Mahavikas Aaghadi: "जोपर्यंत आमची इच्छा आहे तो पर्यंत महाविकास आघाडीसोबत राहू"

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज मेळावा पार पडला. यावेळी मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक दाखल झाले होते. यावेळी मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत यांनी भावी मुख्यमंत्र्यांच्या चर्चेवरून महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला लगावला.

"सध्या महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्र्यांचं पीक जोरात आलं आहे. पाहावं तिकडे भावी मुख्यमंत्री. पण आपण महाविकास आघाडीसोबत आहोत, आणि जोपर्यंत इच्छा आहे तो पर्यंत राहू", असं मोठं विधान खासदार संजय राऊत यांनी यावेळी केलं.

संजय राऊत म्हणाले, "क्रिकेटचं सर्वात सर्वात मोठं स्टेडियम अहमदाबादमध्ये केलं. त्याच कारण असं आहे, मुंबईमधील क्रिकेटचं महत्व कमी व्हावं. क्रिकेट हा खेळ मुंबई आणि महाराष्ट्राला मोठा रोजगार देणारा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट हे गुजरातमध्ये नेण्याच काम सुरू आहे. आता परवा एक वादळ आलंय, बिपरजॉय नावाचं. मोदी आणि शाह यांना वाटलं की हा मोठा प्रकल्प आहे, मग काय त्यांनी बिपरजॉय गुजरातकडे वळवलं आणि केलं नुकसान", असं म्हणत राऊतांनी टोला लगावला.

महाविकास आघाडीबाबत राऊत काय म्हणाले?

"सध्या महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्र्यांचं पीक जोरात आहे. पाहावं तिकडे भावी मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री. माझ्यासमोरही एक भावी मुख्यमंत्री आहेत. आपण राहू महाविकास आघाडीमध्ये जोपर्यत आहोत तोपर्यंत. ज्यावेळी निर्णय घ्यायचा तेव्हा घेऊ. पण मी सांगतो की विद्यमान मुख्यमंत्री समोर बसलेले आहेत. हे काय आमच्या इच्छांवर नाही. हे राजकारण आहे", असं मोठं विधान राऊतांनी यावेळी केलं.

"सध्याचं सरकार न्यायालयाने घटनाबाह्य ठरवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे सरकार डिसमिस केलेले आहे. या सरकारला फाशी दिलेली आहे. त्यामुळे पुढच्या 50 दिवसांत या सरकारला श्रद्धांजली देऊन राज्यात नवीन सरकार आणायचं आहे", असं म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT