Sanjay Raut News:..तर मोदी, शाह, फडणवीस 24 तासात शिवसेनेत प्रवेश करतील; संजय राऊतांचा मिश्किल टोला

Shivsena : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मंबुईत आज मेळावा पार पडत आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज मेळावा पार पडला. यावेळी मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून हजारो शकडो शिवसैनिक दाखल झालेत. यावेळी मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट, पंतप्रधान मोदी, शाह, फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

"जर आमचं सरकार सत्तेत आलं तर 24 तासात मोदी, शाह, फडणवीस शिवसेनेत दाखल होतील", असा मिश्किल टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.

संजय राऊत म्हणाले, "भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी मुंबईवर कब्जा करण्याची भाषा केली आहे. पण त्यांना माझं आव्हान आहे, जर हिंमत असेल तर मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन दाखवा. मग तुम्हाला अस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही", असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला.

Sanjay Raut
Sanjay Raut on Mahavikas Aaghadi: "जोपर्यंत आमची इच्छा आहे तो पर्यंत महाविकास आघाडीसोबत राहू"

याबरोबरच संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. "वाघाचं कातडं पांघरून काही लांडगे गोरेगावला निघाले आहेत. पण माझं एक सांगणं आहे वाघ कसे जातील?, सगळे वाघ मग ते उत्तर प्रदेश, दिल्लीपासून आणि देशाच्या कानाकोपऱ्यापासून येथे आपल्या मेळाव्याला आलेले आहेत", असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेवर त्यांनी टीका केली.

Sanjay Raut
Dada Bhuse News: शिंदे सरकारची कामं थेट लोकांच्या मनात पोहचतात : दादा भुसे

"...तर मोदी, शाह, फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील"

"आम्हाला ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवला. पण मी सांगतो ज्यांनी-ज्यांनी आमचा छळ केला, त्यांची त्यांना व्याजासह परतफेड करावी लागेल. अजूनही अनेकांना ईडी आणि सीबीआयची भीती दाखवत आहेत. पण आम्ही देखील यामधून गेलो आहोत".

"ईडी आणि सीबीआयने ज्या कारवाया केल्या त्या सर्व सुडाच्या भावनेने केलेल्या आहेत. सध्या भारत देश तीन लोकं चालवत आहेत. ते म्हणजे सीबीआय, इन्कम टॅक्स, आणि ईडी. बाकी मोदी देश चालवत आहेत हे सगळं खोटं आहे. पण उद्या आमच्या हातात जर सरकार आलं, तर 24 तासात मोदी, शाह, फडणवीस शिवसेनेत दाखल होतील", असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com