Shrikant Shinde Sarkarnama
मुंबई

Shrikant Shinde : डोंबिवलीतील 'पै फ्रेंड्स लायब्ररी'च्या कार्यक्रमास यंदा खासदार शिंदेंचा 'विशेष' हातभार!

Loksabha Election : विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या कार्यक्रमास भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Bhagyashree Pradhan

Dombivli news : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच डोंबिवलीत अनेक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहेत. त्यातच पै फ्रेंड्स लायब्ररी तर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या पुस्तक अदान प्रदान या कार्यक्रमात डॉ. श्रीकांत शिंदेंनी मोठा हातभार लावल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुशिक्षित मतदारांपर्यंत पोहचणे खासदारांना सोपे होणार असल्याने त्यांच्या हस्तेच या कार्यक्रमाचे उद्घाटन होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे हा उपक्रम चांगला असून मी भेट देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आयोजकांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे खासदार पुत्राने योगदान दिलेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री भेट देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) करणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली. त्यामुळे हा कार्यक्रम निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरवर्षी या कार्यक्रमात मंत्री रवींद्र चव्हाण यांचा मोठा हातभार या कार्यक्रमाला असतो. मात्र यावर्षी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) यांनी देखील पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हातभार लावल्याची माहिती सूत्रांनी दिली. 19 जानेवारी पासून पुढील दहा दिवस म्हणजेच 28 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन डोंबिवली क्रीडा संकुलात येथे भरविण्यात येणार आहे. यादरम्यान मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी शिंदे गट आणि भाजपचे अनेक नेते मंडळी या प्रदर्शनाला भेट देण्याचा प्रयत्न करणार आहेत.

मागच्या आठवड्यात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करून वारकऱ्यांना खुश केले होते. या कार्यक्रमातही खासदार श्रीकांत शिंदे स्वागताध्यक्ष म्हणून पद भूषविले होते. त्यानंतरही श्रीमद् भगवत गीतेवरील प्रवचनाचे आयोजन केले होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता तयारीला लागले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निष्ठेची ठरणार आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी शनिवारी या मतदारसंघात दौरा केला. खासदार श्रीकांत शिंदेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर आणि मंत्री रवींद्र चव्हाण या मतदारसंघात जातीने लक्ष देत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT