Sanjay Raut-Shrikant Shinde Sarkarnama
मुंबई

MP Shrikant Shinde News : खासदार राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले, खासदार शिंदे असे का म्हणाले..!

MP Shrikant Shinde reacted to the allegations made by MP Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया...

Chaitanya Machale

Mumbai News : काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांनी चांगला डॉक्टर बघावा, उपचार घ्यावेत, त्याचा संपूर्ण खर्च आमच्या वैद्यकीय सहायक मंचाकडून केला जाईल, अशा शब्दांत खासदार श्रीकांत शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. सध्या दररोज महाराष्ट्र बघतोय, त्यांची मानसिक स्थिती बिघडत आहे. माझा एक डॉक्टर म्हणून त्यांना सल्ला आहे. मानसिक संतुलन ढासळून न देता त्यांनी एक चांगला डॉक्टर बघावा आणि मानसिक उपचार करून घ्यावेत.

श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मदतीचा आर्थिक स्राेत शोधून या फाउंडेशनच्या संशयास्पद व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी शिवसेना (ShivSena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती. याबाबत राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन पानी पत्र पाठवून या संस्थेला मिळत असलेल्या मदतीची शहानिशा करून चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर खासदार शिंदे आपली प्रतिक्रिया दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) म्हणाले, पत्राचाळ घोटाळ्यात जे आरोपी म्हणून तुरुंगात जाऊन आले आहेत. तेच आता पत्र लिहित आहेत. राज्यात झालेल्या खिचडी घोटाळ्यात ज्यांच्या नातेवाइकांकडे पैसे सापडले आणि जे तुरुंगाची वारी करून आलेत, तेच आता भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. ही मोठी आर्श्चयाची गोष्ट आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडत असून, त्यांनी चांगल्या डॉक्टरकडे उपचार घ्यावेत, त्याचा संपूर्ण खर्च आमचे फाउंडेशन करेल. त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. याचा अर्थ त्यांचा मोदी यांच्यावरील विश्वास वाढत असल्याचे दिसते, असा टोलाही श्रीकांत शिंदे यांनी लगावला.

काय आरोप केले होते, खासदार संजय राऊत यांनी...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असलेल्या श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मदतीची माहिती कोठेही प्रसिद्ध केली जात नाही. ठाणे (Thane) जिल्हा धर्मदाय आयुक्तांकडे या फाउंडेशनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र एक महिना उलटून गेल्यानंतरही त्याची साधी दखल धर्मदाय आयुक्तांनी घेतली नसल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला होता. याबाबत राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र देत चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रसिद्ध वकील नितीन सातपुते यांनी धर्मदाय आयुक्तांकडे वारंवार माहिती मागितली असताही ही माहिती दिली जात नाही.

देशात अलीकडेच 'चंदा दो चंदा लाे हे प्रकरण गाजत आहे. सरकारने अनेक उद्योगपती, कंपन्या, ठेकेदारांना 'कामे देऊन भाजपच्या (BJP) खात्यात निवडणूक रोखेंच्या माध्यमातून आठ हजार कोटींचे धन जमा केले. माननीय सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखे रद्द करताना सरकार आणि निवडणूक रोखे भाजपला देणारे यांचे Quid pro Quo (काहीतरी साठी काहीतरी) हा संबंध पुराव्यासह जोडला. श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडे अशाच मागनि आलेल्या कोट्यवधीच्या रकमांचा 'मार्ग' गुन्हेगारी स्वरूपाचा, मनी लॉण्डरिंग प्रकारचा प्रथमदर्शनी दिसतो. ही बाब गंभीर आहे व आपण त्याबाबत तत्काळ गुन्हा नोंद करून साधारण 500 ते 600 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी तत्काळ ईडी, सीबीआयकडे सोपवून गुन्हेगारांना अटक करावी.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT