New Delhi News : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election News) राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून पैशांचा अमाप वापर सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक सात टप्प्यांत होणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्याआधीच केंद्रीय निवडणूक आयोगाने मागील 75 वर्षांत पहिल्यांदाच सर्वाधिक पैसे, मद्य, अमली पदार्थ, वस्तू जप्त केल्या आहेत. त्याचे मूल्य तब्बल 4 हजार 650 रुपये एवढे आहे. मागील निवडणुकीत आयोगाला संपूर्ण निवडणुकीदरम्यान एवढा पैसा जप्त करता आला नव्हता.
निवडणूक आयोगाकडून (Election Commission) प्रत्येक निवडणुकीमध्ये अवैध पैशांचा वापर रोखण्यासाठी स्थानिक पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत वाहनांची तपासणी तसेच इतर उपाययोजना राबवल्या जातात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून एक मार्चपासून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
आयोगाकडून दररोज सरासरी शंभर कोटी रुपयांचे मुद्देमाल जप्त केला जात आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वीच आयोगाच्या टीमने विविध राज्यांमध्ये रोख रकमेसह सुमारे 4 हजार 650 कोटी रुपये मूल्याचे साहित्य जप्त केले रक्कम जप्त केली आहे. 2019 च्या निवडणुकीत (Election News) जप्त करण्यात आलेल्या एकूण रकमेपेक्षा ही रक्कम अधिक आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यंदा लोकसभेची निवडणूक सात टप्प्यांत आहे. त्यामुळे पुढील जवळपास दीड महिन्यात आयोगाच्या हाती मे घबाड लागण्याची शक्यता आहे. आयोगाकडून मागील दीड महिन्यात 844 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. मागील निवडणुकीत हा आकडा केवळ 395.39 कोटी एवढा होता. या वेळी 304 कोटींचे मद्द, 1 हजार 279 कोटींचे अमली पदार्थ, 987 कोटींचे सोने, चांदी व इतर किमती धातू आणि 60.15 कोटी रुपयांच्या इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात 431 कोटी जप्त
देशात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. राज्यात एकूण 40 कोटी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे, तर 28 कोटींचे मद्य आणि 213 कोटींचे अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. अशाप्रकारे राज्यात एकूण 431 कोटी रकमेचे साहित्य निवडणूक आयोगाकडून जप्त करण्यात आले आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.