Suresh Mhatre VS Ramsheth Thakur  sarkarnama
मुंबई

Suresh Mhatre Video : खासदार बाळ्या मामा प्रचंड आक्रमक, रामशेठ ठाकूरांना प्रत्युत्तर देत म्हणाले, 'तेव्हा तुम्ही नव्हता...', विमानतळ नामांतर वाद पेटला!

Navi Mumbai Airport Suresh Mhatre VS Ramsheth Thakur : नवी मुंबई विमानतळ नामांतरावरून वाद पेटला आहे. आंदोलनात बाळ्या मामा घुसखोरी करत असल्याच्या रामशेठ ठाकूरांच्या आरोपाला खासदार सुरेश म्हात्रेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

सरकारनामा ब्यूरो

राहुल क्षीरसागर

Suresh Mhatre News : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लवकरच होणार आहे. मात्र, विमानतळाला दिवंगत नेते दि बा पाटी यांचे नाव देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा प्रचंड आक्रमक झाले आहेत,

विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अन्यथा भूमिपुत्रांच्या सर्व संघटना ६ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत लाँग मार्च काढतील. दरम्यान, सर्वपक्षीय समितीच्या वतीने गेल्या पाच वर्षांत असंख्य आंदोलने केली. त्यावेळी बाळ्यामामा कुठे होते? ते आंदोलनात घुसखोरी करत असल्याची टीका, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केली होती.

त्यावर बोलताना खासदार म्हात्रे म्हणाले, 'यापूर्वी पहिल्यांदा जेव्हा आंदोलन झाले होते तेव्हा ते किंवा मी सुध्दा त्या आंदोलन नव्हतो. तेव्हा सर्व भूमिपुत्रांनी मिळून ते आंदोलन केले होते. मी त्यांचा आदर करतो. त्यांनी आमचा अनादर करु नये.'

नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. त्यानुसार दि.बा.पाटलांच्या नावाचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे केंद्र सरकार वारंवार सांगत होते. पण मंगळवारी (३०सप्टेंबर) अचानकपणे विमानतळाकरता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाने परवाना जारी करण्यात आला. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे आपली फसगत झाल्याची भावना, नामकरणासाठी आग्रही असणाऱ्या संघटनाची झाली असल्याचे खासदार म्हात्रे यांनी यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले. येत्या ७ ऑक्टोबर केंद्रीय कॅबिनेटची बैठक आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. या विमानतळाला दि. बा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय या बैठकीत होऊ शकतो.

...तर आंदोलन मागे घेऊ

खासदार म्हात्रे म्हणाले, मुख्यमंत्री यांच्यासोबत दोन दिवसात बैठक घेतली जाणार होती. त्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी पुढाकार घेतला होता. परंतु 10 दिवस उलटून गेल्यानंतरही बैठक झालीच नसल्याने आम्हाला आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले आहे. मात्र, आताही नाईक यांनी मुख्यमंत्र्यासोबत बैठक लावून निर्णय घेत असल्याचे आश्वासन दिले तर आम्ही आंदोलन मागे घेऊ.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT