Shankar Patole Arrested : मोठी बातमी! महापालिका उपायुक्ताला 25 लाखांची लाच घेताना अटक, 35 लाखांची डील फायनल केली अन्... !

Thane Municipal Corruption Case : अतिक्रमण हटवण्यासाठी बिल्डरकडून तब्बल 25 लाखांची लाच घेताना पोलिसांनी ठाणे महापालिकेच्या उपायुक्ताला अटक केली.
ACB Trap
ACB TrapSarkarnama
Published on
Updated on

Thane News : ठाणे महापालिकेअंतर्गत अतिक्रमणाचा विषय गंभीर बनला आहे. कोर्टाने फटकाल्यानंतर अतिक्रमणावर कारवाईस ठाणे महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यास सुरुवात झाली होती. मात्र, मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाची घंटाळी परिसरात जागा असून त्या जागेवर अतिक्रमण झाले होते.हे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेचे उपायुक्त आणि अतिक्रमण विभागाचे प्रमुख शंकर पाटोळे यांनी तब्बल 35 लाख रुपयांची मागणी केली होती.

बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बिल्डरकडून 25 लाख रुपये घेताना पाटोळे यांना एसीबीने रंगेहाथ पकडले. पाटोळे यांनी यापूर्वीच बिल्डरकडून दहा लाख रुपये घेतले होते. लाचेचा दुसरा हफ्ता घेत असताना त्यांना पकडण्यात आले.

एकीकडे ठाणे महापालिकेचा ४३ वा वर्धापनदिन साजरा होत असताना दुसरीकडे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्ताला 35 लाख रुपये घेतल्याच्या आरोपाखाली मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी सायंकाळी ताब्यात घेतल्याने त्यामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडालीआहे.

ACB Trap
Maharashtra MLA: फडणवीस सरकारचं पारदर्शक कारभारासाठी उचललं मोठं पाऊल; सर्व आमदारांच्या खर्चावर ठेवणार 'वॉच'

बिल्डरची एसीबीकडे धाव...

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बिल्डरची ठाण्यातील घंटाळी परिसरात जागा आहे. या जागेत अतिक्रमण झाल्याने बिल्डरकडून हे अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी त्यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाशी संपर्क साधला. पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी त्यांच्याकडे कारवाईसाठी 35 लाखांची लाच मागितली. या प्रकरणाची तक्रार बिल्डरने थेट मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

ACB Trap
RSS History : ना कुठली घोषणा, ना फेमस चेहरा : 100 वर्षांपूर्वी कशी झाली RSS ची स्थापना?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com