Maharashtra MLA: फडणवीस सरकारचं पारदर्शक कारभारासाठी उचललं मोठं पाऊल; सर्व आमदारांच्या खर्चावर ठेवणार 'वॉच'

Maharashtra MLA expenses monitoring : स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी दरवर्षी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येतो. या निधीचा पारदर्शक आणि कार्यक्षम वापर सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारने नवी ऑनलाइन यंत्रणा विकसित केली आहे.
Mahayuti government
Mahayuti governmentSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यातील सर्व आमदारांना स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी देण्यात येतो. आमदारांच्या मार्फत हा निधी विविध विकासकामांच्या साठी वापरण्यात येतो. आता या विकास निधीच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य शासनाने एक नवीन ऑनलाइन प्रणाली विकसित केले आहे. या प्रणालीमुळे सर्व आमदारांच्या (MLA) खर्चावरती नियंत्रण राहणार आहे.

राज्यातील विधानसभेच्या 288 आणि विधानपरिषदेच्या 78 आमदारांना स्थानिक विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी रुपये वार्षिक निधी दिला जातो. याशिवाय, डोंगरी भाग विकास कार्यक्रमांतर्गत 77 तालुक्यांना प्रत्येकी 2 कोटी रुपये आणि 101 तालुक्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपये निधी उपलब्ध होतो. या निधीवर आता सरकारचा ऑनलाईन वॉच राहणार आहे.

स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी दरवर्षी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येतो. या निधीचा पारदर्शक आणि कार्यक्षम वापर सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारने (State Government)'ई-समर्थ' नावाची ऑनलाइन यंत्रणा विकसित केली आहे.

या यंत्रणेची सुरुवात प्रायोगिक तत्त्वावर पुणे जिल्ह्यात होणार असून, यशस्वी अंमलबजावणीनंतर ती राज्यभर लागू केली जाईल. ही प्रणाली केंद्र सरकारच्या खासदारांसाठी असलेल्या 'ई-साक्षी' यंत्रणेच्या धर्तीवर तयार करण्यात आली आहे. यामुळे आमदारांना विकासकामांचे प्रस्ताव थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविता येतील आणि त्यांचा रिअल-टाइम मागोवा घेणे शक्य होईल. यामध्ये रस्ते, खर्च, प्रलंबित प्रस्ताव आणि प्रत्यक्ष कामांची अंमलबजावणी यासारख्या सर्व बाबींचा समावेश असेल.

Mahayuti government
Shahu Maharaj: शाहू महाराजांचा एकाचवेळी राज्य सरकार अन् जरांगेंना झटका; मराठा आरक्षणाबाबत धक्कादायक विधान,नव्या लढाईची घोषणा

सार्वजनिक निधीच्या वापरात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे. राज्य नियोजन विभागाच्या पुढाकाराने विकसित केलेल्या या प्रकल्पाचे सादरीकरण जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्यासमोर झाले. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या यंत्रणेला अंतिम स्वीकृती मिळाली. पुणे जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांच्या देखरेखीखाली ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com